Nokia ने आणला 7 हजार 450 रुपयांचा फोल्डेबल फोन; 4GB रॅमसह मिळतात दोन डिस्प्ले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

affordable nokia 2780 flip launched with 4gb ram and two display check price and all details

Nokia ने आणला 7 हजार 450 रुपयांचा फोल्डेबल फोन; 4GB रॅमसह मिळतात दोन डिस्प्ले

नोकियाने आपला स्वस्त फोल्डेबल फोन लॉन्च केला आहे. होय, कंपनीने Nokia 2780 Flip हा आपला नवीन फ्लिप फोन म्हणून जागतिक बाजारात लॉन्च केला आहे. हा एचएमडी ग्लोबलचा लेटेस्ट फीचर फ्लिप फोन आहे. दिसायला, हा डिवाइस नोकिया 2760 फ्लिप सारखाच आहे, जो कंपनीने या वर्षी मार्चमध्ये लॉन्च केला होता. Nokia 2780 Flip ची किंमत काय आहे आणि यामध्ये काय खास आहे, चला सविस्तर सर्व काही जाणून घेऊ..

फोनमध्ये काय खास आहे?

Nokia 2780 Flip मध्ये 2.7-इंचाचा TFT डिस्प्ले आणि बाहेरील बाजूस 1.77-इंचाचा सेंकडरी डिस्प्ले दिला आहे. बाहेरील डिस्प्ले वेळ, कॉलर आयडी आणि इतर अपडेट्स दाखवतो. सेंकडरी स्क्रीनच्या वर LED फ्लॅशसह 5MP कॅमेरा सेन्सर देखील आहे. फिचर फ्लिप फोनमध्ये क्लॅमशेल डिझाइन आणि T9 कीबोर्ड दिला आहे. नोकिया 2780 फ्लिप डेली वापरादरम्यान रफ अँड टफ वापरासाठी डिझाइन केला आहे.

नोकिया 2780 फ्लिप क्वालकॉम 215 प्रोसेसरसह सुसज्ज आहे ज्यामध्ये 1.3GHz क्लॉक केलेला क्वाड-कोर CPU आणि 150Mbps च्या पीक डाउनलिंक स्पीडसह X5 LTE मॉडेम समाविष्ट आहे. फोनमध्ये 4GB रॅम आणि 512MB स्टोरेज आहे. डिव्हाइस मध्ये 1450mAh काढता येणारी बॅटरी दिली आहे.

हेही वाचा: Viral Video: 'या' तरुणानं वाचवला इम्रान खान यांचा जीव; सोशल मिडीयावर होतंय कौतुक

सॉफ्टवेअरच्या बाबत बोलयाचे झाल्यास, नोकिया 2780 फ्लिप आउट-ऑफ-द-बॉक्स KaiOS 3.1 वर चालतो. हा फोन हिअरींग अँड कम्पपॅटिबीलीटी आणि रिअल टाईम कंटेट यांसारख्या फीचर्स देखील मिळतात, यामुळे कॉलच्या मध्ये देखील टेक्स्ट मेसेज पाठवता येतात. यात गुगल मॅप्स, यूट्यूब आणि वेब ब्राउझर देखील आहे. फीचर फोन वायफाय, एमपी3 आणि एफएम रेडिओसह येतो.

हेही वाचा: Tata Nexon: टाटाने बंद केले नेक्सॉनचे 6 व्हेरिएंट; खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या यादी

टॅग्स :Nokia