

AI Whatsapp Chatbot
ESakal
मुंबई : दिव्यांग कल्याण विभागाकडून ‘एआय आधारित’ व्हॉट्सॲप चॅटबॉट सुरू करण्यात आला आहे. दिव्यांग व्यक्तींना योजनांची माहिती मिळवताना किंवा तक्रारी दाखल करताना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी ही सेवा सुरू करण्यात आली आहे. या चॅटबॉटमध्ये ‘भाषिणी’ तंत्रज्ञानावर आधारित व्हॉइस नोटद्वारे तक्रार नोंदवण्याची व्यवस्था आहे, असे दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी सांगितले.