
esakal
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) क्षेत्रात क्रांती घडवणाऱ्या ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमन यांनी नुकतेच एक महत्त्वाचे विधान केले आहे. 2030 पर्यंत कृत्रिम बुद्धिमत्ता सुपरइंटेलिजन्सच्या पातळीवर पोहोचेल जी मानवाच्या बुद्धिमत्तेला मागे टाकेल, असे त्यांनी म्हटले आहे. यामुळे एकीकडे वैज्ञानिक शोधांचे नवे दालन उघडेल, तर दुसरीकडे सुमारे 40% नोकऱ्या धोक्यात येतील, असा इशारा त्यांनी दिला आहे. ऑल्टमन यांच्या मते कृत्रिम बुद्धिमत्ता मानवाच्या क्षमतेपेक्षा अधिक वेगाने प्रगती करत आहे आणि येत्या काही वर्षांत अर्थव्यवस्थेतील 30-40% कामे स्वयंचलित होऊ शकतात.