Fake News AI Monitor : सोशल मिडियावर खोट्या बातम्या,पोस्ट पसरवाल तर जेलमध्ये जाल! AI ठेवत आहे तुमच्यावर नजर, नेमका काय विषय?

Fake News Monitoring AI Tool : बनावट पोस्ट आणि अफवांवर नियंत्रण ठेवण्यासाठी बेंगळुरू पोलिस लवकरच एआय आधारित टूल आणणार आहेत. हे टूल सोशल मीडियावरील फेक न्यूज ओळखून त्यावर तत्काळ कारवाई करेल.
Fake News Monitoring AI Tool
Fake News Monitoring AI Toolesakal
Updated on

Fake News Monitoring AI Tool : देशातील डिजिटल माध्यमांमध्ये झपाट्याने पसरत असलेल्या फेक न्यूज, अफवा आणि भ्रामक माहितीवर अंकुश आणण्यासाठी आता कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित अत्याधुनिक मॉनिटरिंग प्लॅटफॉर्म तयार करण्यात येत आहे. बेंगळुरू पोलिसांच्या पुढाकाराने हे तंत्रज्ञान लवकरच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी वापरण्यात येणार आहे.

सोशल मीडियावरून अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई

फेसबुक, इनस्टा , X (पूर्वीचे ट्विटर) यूट्यूब यांसारख्या लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फेक फोटो, व्हिडीओ, बनावट पोस्ट शेअर करणाऱ्या व्यक्तींवर आता नजर ठेवली जाणार आहे. AI-चालित हे नवे टूल फक्त एका किवर्डच्या आधारे शोध सुरू करू शकते आणि संबंधित बनावट कंटेंट किंवा अफवा लगेच हेरू शकते.

या टूलचा वापर भारतातीलच नव्हे तर आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्म्सवरील माहितीचे विश्लेषण करण्यासाठी होणार आहे. यात सोशल मीडिया पोस्ट, न्यूज मीडिया लेख आणि सार्वजनिक डोमेनमधील फोरम्स किंवा बोर्ड्स यांचा समावेश असेल. TikTok, YouTube, Vimeo सारख्या व्हिडीओ शेअरिंग साइट्सवरील कंटेंट देखील तपासला जाईल.

Fake News Monitoring AI Tool
Motorola Edge 50 Offer : जबरदस्त फीचर्स अन् ब्रँड कॅमेरावाल्या Moto Edge 50 मोबाईलवर चक्क 25% डिस्काउंट, खरेदी करा एका क्लिकवर

AI द्वारे वापरकर्त्यांचे प्रोफाइलिंग व भाषेचे विश्लेषण

या प्लॅटफॉर्ममध्ये केवळ फेक कंटेंट शोधण्याचीच नाही, तर वापरकर्त्याच्या पॅटर्नवरून त्याचे प्रोफाइल तयार करण्याची क्षमताही असेल. याशिवाय सोशल मीडियावरील अपमानास्पद, अयोग्य किंवा भडकाऊ भाषा वापरणारे शब्द देखील या टूलद्वारे हेरले जातील आणि त्यावर नियंत्रण ठेवले जाईल.

बेंगळुरू पोलिस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याबाबतची माहिती दिली असून या AI प्रणालीसाठी आवश्यक टेंडर आधीच जाहीर करण्यात आले आहेत. हे टूल संस्था, ब्रँड, व्यक्ती, विशिष्ट विषय किंवा घटकांशी संबंधित फेक माहिती शोधण्यात अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

Fake News Monitoring AI Tool
Whatsapp New Features : व्हॉट्सअ‍ॅपमध्ये 2 भन्नाट फीचर्सची एंट्री; मेसेज चॅटिंगसाठी खूपच फायद्याचं, पाहा एका क्लिकवर

हे AI टूल केवळ तांत्रिकदृष्ट्या आधुनिक नसून देशातील माहिती सुरक्षेसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे. चुकीच्या माहितीमुळे समाजात गैरसमज, दहशत आणि अशांतता निर्माण होऊ शकते, यावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकार आणि पोलिसांची ही पावले स्वागतार्ह आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com