
Whatsapp Chat New Features : जगातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप आता आपल्या युजर्ससाठी आणखी एक भन्नाट फिचर घेऊन येत आहे. दर महिन्याला नव्या अपडेट्समधून व्हॉट्सअॅप युजर एक्सपीरियन्स अधिक चांगला करत असतो आणि यंदाच्या वर्षातही कंपनीने काही महत्त्वाचे फिचर्स लाँच केले आहेत. आता मात्र सर्वाधिक चर्चेत आहे ‘Message Summary’ हे नवे फिचर, जे लवकरच वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होणार आहे.
नव्या फिचरद्वारे व्हॉट्सअॅप युजर्सना त्यांच्या इंडिव्हिज्युअल चॅट्स, ग्रुप्स आणि चॅनेल्समध्ये आलेल्या मेसेजेसची झटपट सारांशरूप माहिती मिळणार आहे. म्हणजेच, मेसेज उघडून प्रत्येक ओळ वाचायची गरज नाही फक्त एका क्लिकवर संपूर्ण मेसेजचा सारांश वाचता येईल.
हे फिचर व्हॉट्सअॅपच्या Android Beta Version 2.25.15.12 मध्ये टेस्टिंगच्या टप्प्यात आहे. यामध्ये Meta AI वापरून मेसेजेसचे अचूक आणि संक्षिप्त हायलाईट्स दिले जातील, जे विशेषतः बिझी युजर्ससाठी फार उपयुक्त ठरणार आहे.
व्हॉट्सअॅप केवळ नव्या सुविधांपुरतेच मर्यादित नाही, तर युजर्सची प्रायव्हसी मजबूत करण्यासाठीही नवे उपाययोजना करत आहे. अलीकडेच सादर करण्यात आलेल्या ‘Advanced Chat Privacy’ फिचरमुळे कोणताही मेसेज डाऊनलोड किंवा एक्सपोर्ट करता येणार नाही अशी मर्यादा पाठवणाऱ्याला लावता येणार आहे. म्हणजेच आता तुमचे खाजगी चॅट्स इतरांच्या हातात पडण्याची भीती बऱ्याच अंशी दूर होणार आहे.
व्हॉट्सअॅप नेहमी युजर्सच्या गरजा लक्षात घेऊन नवनवीन सुविधा आणत असतो. ‘Message Summary’ आणि ‘Advanced Chat Privacy’ ही दोन्ही फिचर्स वापरकर्त्यांचा वेळ वाचवणार, संवाद अधिक चांगला सेफ बनवणार आणि गोपनीयतेची हमीही देणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.