Instagram : इंस्टाग्राम वापरकर्त्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. लवकरच तुम्ही तुमच्या आवडत्या इंस्टाग्राम कलाकारांशी चॅट करू शकणार आहात. मेटाच्या सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी गुरुवारी घोषणा केली आहे की, इंस्टाग्रामवर तुम्हाला तुमच्या आवडत्या कलाकारांची AI आवृत्ती आणि तुमच्या आवडीच्या क्षेत्राशी संबंधित AIला सुरुवात होईल.
हे नवीन "एआय स्टुडियो"च्या माध्यमातून शक्य होणार आहे. या फीचरच्या सहाय्याने कलाकार आपले AI चॅटबॉट बनवू शकतील, जे त्यांच्या प्रेक्षकांशी संवाद साधू शकतील.
सध्या ही सुविधा चाचणीच्या स्वरुपात अमेरिकेत सुरु असून सुमारे ५० कलाकार यात सहभागी आहेत. पुढच्या महिन्यापासून हे फीचर मोठ्या प्रमाणात लाँच होण्याची शक्यता आहे.
झुकरबर्ग यांनी हेही स्पष्ट केले आहे की, हे AI संवाद फक्त डायरेक्ट मेसेजमध्येच शक्य असतील आणि ते AI द्वारे जनरेटेड असल्याचे स्पष्टपणे दर्शवले जाईल.
वापकर्ते कलाकाराच्या इंस्टाग्राम प्रोफाइलवरुन "संदेश" बटण दाबून संवाद सुरु करू शकतात. या संदेशांवर एक सूचना दिसेल जी हे संवाद AI द्वारे जनरेटेड असून या संभावदासाठी मेटा त्यांच्या नावापुर्वी "AI" असा टॅग आणि "बेटा" असा टॅग लावेल.
"आम्ही कलाकारांसोबत एकत्र मिळून काम करत आहोत जेणेकरुन हे AI त्यांना त्यांच्या फॉलोअर्सच्या प्रश्नांना उत्तरे देण्यात आणि लोकांशी उपयुक्त आणि मनोरंजक चॅट करण्यात मदत करतील," असे झुकरबर्ग यांनी स्पष्ट केले. "ही आता सुरुवात आहे आणि या AI ची पहिली बीटा आवृत्ती आहे, त्यामुळे आम्ही त्यांचे सुधार करण्यावर आणि लवकरच अधिक लोकांसाठी उपलब्ध करण्यावर काम करत राहू."
मेटाच्या व्यापक AI रणनीतीबद्दल बोलताना झुकरबर्ग म्हणाले, "आम्हाला वाटते की लोकांना विविध प्रकारच्या लोकांशी आणि व्यवसायांशी संवाद साधायचा आहे आणि लोकांच्या विविध आवडी प्रतिबिंबित करण्यासाठी विविध प्रकारचे AI तयार केले जाणे आवश्यक आहे."
मेटाचा उद्देश कलाकार आणि भविष्यात लहान व्यवसायांना त्यांच्या समुदायांशी आणि ग्राहकांशी संवाद साधण्यासाठी स्वतःचे AI विकसित करण्यास मदत करणे आहे. हा दृष्टिकोन सिंगल, जेनरिक AI असिस्टंटपेक्षा अधिक गतिशील आणि आकर्षक अनुभव देईल असे झुकरबर्ग यांचे मत आहे. याशिवाय, मेटा अशा AI व्यक्तिरेखा तयार करण्याची परवानगी देईल ज्या कलाकारांचे थेट प्रतिनिधित्व नसतील.
गेल्या वर्षी मेटा AI असिस्टंट आणि सेलिब्रिटी-थीम असलेले चॅटबॉट्स सादर करताना झुकरबर्ग यांनी अशीच विधाने केली होती. आता एआय स्टुडियो चाचणीच्या टप्प्यात असल्याने, या यशाचे खरे मापदंड म्हणजे वापकर्ते आपल्या आवडत्या कलाकारांच्या AI आवृत्तींशी चॅट करण्यास तयार आहेत की नाही या गोष्टीवर ठरेल.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.