Airtel Plans: अवघ्या ३५ रुपयांचा शानदार रिचार्ज प्लॅन लाँच, बेनिफिट्स एकदा पाहाच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Airtel Plans

Airtel Plans: अवघ्या ३५ रुपयांचा शानदार रिचार्ज प्लॅन लाँच, बेनिफिट्स एकदा पाहाच

Airtel Prepaid Recharge Plans: देशातील दुसरी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी एअरटेल ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक नवनवीन प्लॅन्स लाँच करत असते. आता कंपनीने अवघ्या ३५ रुपयांचा शानदार प्रीपेड प्लॅन लाँच केला आहे. खूपच कमी किंमतीत मिळणाऱ्या या प्लॅन्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

हेही वाचा: Flipkart Sale: बंपर डिस्काउंट! खूपच स्वस्तात मिळतोय Samsung चा 5G फोन, पाहा डिटेल्स

Airtel चा ३५ रुपयांचा प्रीपेड प्लॅन

Airtel च्या ३५ रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये तुम्हाला अनेक शानदार फीचर्स मिळतील. हा प्लॅन कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर दिसत नाही. मात्र, मोबाइल अ‍ॅपवरून तुम्ही हा प्लॅन घेऊ शकता.

मात्र, लक्षात घ्या की एअरटेलचा हा ३५ रुपयांचा प्लॅन एक डेटा वाउचर आहे. म्हणजे या प्लॅनमध्ये तुम्हाला केवळ डेटाचा फायदा मिळेल. यात कॉलिंग आणि एसएमएसची सुविधा मिळणार नाही. तुमच्या नियमित प्लॅनमध्ये डेटा समाप्त झाल्यास या डेटा वाउचरचा फायदा घेऊ शकता.

हेही वाचा: Xiaomi Smart TV: चक्क निम्म्या किंमतीत मिळतोय मोठ्या स्क्रीनसह येणारा स्मार्ट टीव्ही, जाणून घ्या ऑफर

३५ रुपयांच्या या डेटा वाउचरची वैधता २ दिवस आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला २ दिवसांसाठी एकूण २ जीबी डेटा दिला जातो. म्हणजेच प्रति दिवसाचा खर्च जवळपास १७.५ रुपये आहे.

दरम्यान, कंपनीकडे १९ रुपयांचा डेटा प्लॅन देखील उपलब्ध आहे. Airtel च्या १९ रुपयांच्या प्लॅनमध्ये १ दिवसांची वैधता मिळते. यात १ जीबी डेटा दिला जातो. तुम्हाला जर स्वस्त डेटा वाउचर हवा असल्यास १९ रुपयांचा प्लॅन फायद्याचा ठरेल.

हेही वाचा: गुंतवणूक करताना ‘हम होंगे कामयाब, पूरा है विश्वास!’...पण कसे? घ्या जाणून