Flipkart Sale: बंपर डिस्काउंट! खूपच स्वस्तात मिळतोय Samsung चा 5G फोन, पाहा डिटेल्स

Flipkart Big Saving Days Sale ला लवकरच सुरुवात होत असून, सेलमध्ये सॅमसंगच्या फोनवर बंपर डिस्काउंट मिळेल.
Samsung Phone
Samsung PhoneSakal

Discount on Samsung Galaxy S21 FE: ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Flipkart ने Big Saving Days Sale ची घोषणा केली आहे. १५ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या या सेलमध्ये अनेक प्रोडक्ट्सवर बंपर डिस्काउंट दिले जात आहे. तुम्ही जर नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे चांगली संधी आहे.

२० जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या सेलमध्ये Nothing Phone 1, Pixel 6, Samsung Galaxy S21 FE सारख्या स्मार्टफोन्सवर बंपर डिस्काउंट दिले जात आहे. सेलमध्ये स्वस्तात उपलब्ध असलेल्या Samsung Galaxy S21 FE स्मार्टफोनविषयी सविस्तर जाणून घेऊया.

Samsung Phone
Xiaomi Smart TV: चक्क निम्म्या किंमतीत मिळतोय मोठ्या स्क्रीनसह येणारा स्मार्ट टीव्ही, जाणून घ्या ऑफर

Samsung Galaxy S21 FE वर मिळेल बंपर डिस्काउंट

फ्लिपकार्टवर Samsung Galaxy S21 FE स्मार्टफोन खूपच स्वस्तात उपलब्ध आहे. या फोनवर फ्लॅट डिस्काउंट उपलब्ध नाही. मात्र, तरीही फक्त ३४,९९९ रुपये किंमतीत खरेदी करू शकता. फोनवर बँक आणि एक्सचेंज ऑफरचा फायदा मिळेल. ऑफरचा पूर्ण फायदा मिळाल्यास हा फोन आतापर्यंतच्या सर्वात कमी किंमतीत खरेदी करता येईल.

कंपनीने गेल्यावर्षी या फोनला लाँच केले होते. त्यावेळी हँडसेटची किंमत ४९,९९९ रुपये होती. मात्र, सेलमध्ये फक्त ३४,९९९ रुपयात उपलब्ध होईल.

हेही वाचा: Best Smartphones: नवीन फोन खरेदी करायचाय? १२ हजारांच्या बजेटमधील 'हे' हँडसेट एकदा पाहाच

Samsung Galaxy S21 FE चे स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy S21 FE मध्ये ६.४ इंच Full HD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. स्क्रीनच्या प्रोटेक्शनसाठी Gorilla Glass Victus चा सपोर्ट मिळेल. फोनमध्ये ८ जीबी रॅम आणि १२८/२५६ जीबी स्टोरेज देण्यात आले आहे. तर फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.

सॅमसंगच्या या हँडसेटमध्ये रियरला १२ मेगापिक्सल + १२ मेगापिक्सल + ८ मेगापिक्सल कॅमेरा मिळतो. तर फ्रंटला ३२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. पॉवर बॅकअपसाठी ४५०० एमएएचची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. फोन वायरलेस चार्जिंग आणि फास्ट चार्जिंग सपोर्टसह येतो. यात इतरही भन्नाट फीचर्स मिळतील.

हेही वाचा: गुंतवणूक करताना ‘हम होंगे कामयाब, पूरा है विश्वास!’...पण कसे? घ्या जाणून

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com