esakal | Airtel चा कुटुंबासाठी बेस्ट प्लॅन, मिळेल 260 GB डेटा अन् बरंच काही
sakal

बोलून बातमी शोधा

bharti airtel

Airtel चा कुटुंबासाठी बेस्ट प्लॅन, 260 GB डेटा अन् बरंच काही

sakal_logo
By
टीम ई सकाळ

देशातील आघाडीची टेलिकॉम कंपनी एअरटेलने काही दिवसांपूर्वी 'एअरटेल ब्लॅक' (airtel black) प्लॅन सेवा सुरू केली आहे. या प्लॅनमध्ये वापरकर्ते त्यांच्या गरजेनुसार कस्टम प्लॅन तयार करू शकतात. परंतु जर तुम्हाला कंपनीने तयार केलेला एखादा प्लॅन पाहिजे असेल तर आपण दरमहा 2,099 रुपयांच्या एअरटेल 'ब्लॅक प्लॅन' निवडू शकता. 'एअरटेल ब्लॅक' चा हा प्लॅन एका छोट्या कुटुंबासाठी किंवा मित्रांच्या ग्रुपसाठी खास तयार केला गेला आहे. (airtel-black-family-plan-offers-postpaid-connections-dth-fiber-broadband-and-landline-service)

एअरटेल ब्लॅक प्लॅन काय आहे?

भारती एअरटेलचा एअरटेलचा हा ब्लॅक प्लॅन जीएसटी फ्री आहे. ही सेवा फक्त अशा वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे ज्यांच्याकडे आधीपासून कंपनीचे पोस्टपेड मोबाइल कनेक्शन आहे. सध्या एअरटेल ब्लॅक प्लॅन प्रीपेड वापरकर्त्यांसाठी उपलब्ध नाही. 2,099 रुपयांचा एअरटेल ब्लॅक प्लॅनमध्ये वापरकर्त्यांसाठी अनेक फायदे देण्यात आलेले आहेत यामध्ये पोस्टपेड कनेक्शन्स, डायरेक्ट-टू-होम (DTH) सेवा आणि फायबर ब्रॉडबँड + लँडलाईन सेवा उपलब्ध आहे. इतकेच नाही तर या प्लॅनमध्ये तुम्हाला अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओ आणि एअरटेल एक्सस्ट्रीम सारख्या दोन ओव्हर-द-टॉप (OTT) प्लॅटफॉर्मचे सब्स्क्रीप्शन देखील मिळेल.

हेही वाचा: ई- वाहन खरेदी करणाऱ्या नागरिकांना मिळणार आर्थिक सवलत

2,099 प्लॅनमध्ये मिळतील हे फायदे

  • वापरकर्त्यांना एक नियमित सिम आणि दोन अ‍ॅड-ऑन सिम असलेले तीन पोस्टपेड मोबाइल कनेक्शन मिळतील. पोस्टपेड कनेक्शनमध्ये, वापरकर्त्यांना अमर्यादित व्हॉईस कॉलिंगसह 260 जीबी डेटा मिळेल.

  • डीटीएच सेवेद्वारे वापरकर्ते 1,500 रुपये one time रिफंडेबल Fee भरुन विनामूल्य Xstream बॉक्स मिळवू शकतात. डीटीएच कनेक्शनमुळे वापरकर्त्यांना 424 रुपयांचे चॅनेल पॅक फ्री मिळेल.

  • फायबर ब्रॉडबँड कनेक्शनद्वारे (fiber broadband connection) वापरकर्त्यांना अमर्यादित व्हॉईस कॉलिंगसह एक फ्री लँडलाइन कनेक्शन- 200 Mbps डाउनलोड आणि अपलोड स्पीड मिळेल.

  • 200 Mbps स्पीडने फायबर ब्रॉडबँड कनेक्शनची स्टँडअलोन खर्च मिळून दरमहा किंमत 12,00 रुपये दरमहा होईल. याशिवाय डीटीएच कनेक्शनसाठी एअरटेलचे बिल आणि एकट्या तीन पोस्टपेड सिम कनेक्शनसाठी एका कुटुंबाला दरमहा 3000 रुपयांपेक्षा जास्त किंमत मोजावी लागेल.

  • जर कुटुंब देखील लहान असेल किंवा तुमचा तीन लोकांचा ग्रुप असेल तर आपण एअरटेलचा हा एअरटेल ब्लॅक 2,099 रुपयांचा प्लॅन घेऊ शकता. सर्व सेवांसाठी वापरकर्त्यांना फक्त एकदा बिल द्यावे लागेल. तसेच तुम्हाला हवे तेव्हा हा प्लॅन बंद देखील करु शकता.

(airtel-black-family-plan-offers-postpaid-connections-dth-fiber-broadband-and-landline-service)

हेही वाचा: Redmi चा पहिला 5G स्मार्टफोन भारतात लॉंच; जाणून घ्या किंमत

loading image