esakal | खिशाला परवडणारा Redmi चा 5G स्मार्टफोन भारतात लॉंच; जाणून घ्या किंमत
sakal

बोलून बातमी शोधा

Redmi Note 10T 5G

Redmi चा पहिला 5G स्मार्टफोन भारतात लॉंच; जाणून घ्या किंमत

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

Redmi Note 10T 5G : हँडसेट निर्माता Xiaomi कंपनीचा सब-ब्रँड असलेल्या रेडमीने ग्राहकांकरिता भारतात आपला पहिला 5G स्मार्टफोन Redmi Note 10T 5G बाजारात लॉंच केला आहे. हा फोन Redmi Note 10 मालिकेतील पाचवे मॉडेल असून कंपनीने यापूर्वी Redmi Note 10, Redmi Note 10 Pro Max, Redmi Note 10S आणि Redmi Note 10 Pro लॉन्च केले आहेत. आज आपण या रेडमीच्या या 5G मोबाइल फोनची सर्व वैशिष्ट्ये आणि किंमतीबद्दल जाणून घेणार आहोत. (redmi-note-10t-5g-mobile-launched-in-india-know-price-features)

डिस्प्ले - ड्युअल सिम (नॅनो) सपोर्ट असणार्‍या या रेडमी स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचाचा फुल-एचडी + (1,080x2,400 पिक्सल) डिस्प्ले देण्यात आलेला आहे. यात आस्पेक्ट रेशो 20: 9 आणि अडॅप्टिव्ह रीफ्रेश दर 90 हर्ट्ज पर्यंत आहे.

प्रोसेसर, रॅम आणि स्टोरेज - या फोनमध्ये स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी 6 जीबी पर्यंत रॅम आणि 64 जीबी/128 जीबी इंटरनल स्टोरेजसह ऑक्टा-कोर MediaTek Dimensity 700 SoC देण्यात आलेले आहे.

हेही वाचा: Pegasus पाळत कशी ठेवतं? महागड्या टेक्नॉलॉजीसाठी कोट्यवधींचा खर्च

कॅमेरा - रेडमी नोट 10 टी 5 जी या फोनमध्ये 48 मेगापिक्सल प्राइमरी कॅमेरा सेन्सर तसेच मागील पॅनेलवर फोटोग्राफीसाठी तीन रियर कॅमेरे देण्यात आले आहेत, त्याचबरोबर 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा आणि 2 मेगापिक्सल डेप्थ कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेन्सर दिलेला आहे.

कनेक्टिव्हिटी - फोनमध्ये 4G LTE, 5G, ब्लूटूथ व्हर्जन 5.1, इन्फ्रारेड (आयआर) ब्लास्टर, जीपीएस, ए-जीपीएस, एनएफसी, 3.5 एमएम हेडफोन जॅक आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट दिले आहे. सुरक्षेसाठी फोनच्या बाजुला फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.

बॅटरी - Xiaomi कंपनीने या फोनमध्ये 18W फास्ट चार्ज सपोर्टसह 5000mAh बॅटरी दिली आहे.

डायमेंशन्स - Xiaomi Redmi Note 10T 5G स्मार्टफोनची लांबी 161.81 x 75.34 x 8.92 मिमी आणि वजन 190 ग्रॅम आहे.

हेही वाचा: जगात इंटरनेट स्पीडमध्ये भारत पाकिस्तान अन् नेपाळच्याही मागे

Redmi Note 10T 5Gची किंमत काय?

भारतात लेटेस्ट 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत 13,999 रुपये निश्चित केली गेली आहे, तर 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 15,999 रुपये निश्चित करण्यात आली आहे. फोनचे चार कलर व्हेरिएंट लॉन्च केले गेले आहेत, ग्रेफाइट ब्लॅक, क्रोमियम व्हाइट, मिंट ग्रीन आणि मेटलिक ब्लू. या फोनची विक्री 26 जुलैपासून Xiaomi च्या अधिकृत वेबसाइट एमआय डॉट कॉम व्यतिरिक्त Amazon वर सुरू होईल.

(redmi-note-10t-5g-mobile-launched-in-india-know-price-features)

loading image