एअरटेलचा 28 दिवसांचा प्लॅन; दररोज 2.5GB डेटासह मिळेल अजून बरंच काही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

airtel prepaid plans

एअरटेलचा 28 दिवसांचा प्लॅन; दररोज 2.5GB डेटासह मिळेल अजून बरंच काही

भारती एअरटेलच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक प्रीपेड रिचार्ज प्लॅन आहेत, जे तुम्हाला भरपूर डेटा ऑफर करतात. जर तुमचा डेटा वापर जास्त असेल आणि तुम्हाला 2.5GB पर्यंत डेली हाय-स्पीड डेटा आणि अमर्यादित कॉलिंगसह मोफत SMS ऑफर करणारा प्लॅन शोधत असाल, तर आपण काही ऑप्शन पाहाणार आहोत.

एअरटेल आपल्या वापरकर्त्यांना अनेक 2.5GB दैनिक डेटा प्लॅनचा पर्याय देते. यामध्ये उपलब्ध असलेले बहुतांश बेनिफीट्स सारखेच आहेत, परंतु वैधता वेगळी आहे. आज आपण 28 दिवसांच्या वैधतेचा Airtel चा प्रीपेड रिचार्ज पॅक पाहाणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला दररोज 2.5GB हाय-स्पीड डेटा मिळतो. तसेच आपण या प्लॅनची ​​ इतर टेलिकॉम ऑपरेटर्सच्या प्लॅनशी तुलना करणार आहोत.

हेही वाचा: Redmi 10 Vs Realme 9i : दोन्हीत बेस्ट स्मार्टफोन कोणता? जाणून घ्या

Airtel चा 449 रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लॅन

एअरटेलच्या 449 रुपयांच्या प्रीपेड रिचार्ज प्लॅनमध्ये, तुम्हाला 28 दिवसांच्या वैधतेसाठी दररोज 2.5GB हाय-स्पीड डेटा मिळतो. हा अमर्यादित डेटा प्लॅन आहे, याचा अर्थ डेटा कोटा संपल्यानंतरही तुम्हाला अमर्यादित ब्राउझिंग आणि डाऊनलोडिंग बेनिफीट्स मिळत राहतील, परंतु स्पीड 64Kbps पर्यंत घसरते. या प्लॅनमध्ये 100 मोफत एसएमएस देखील उपलब्ध आहेत, परंतु दैनंदिन कोटा संपल्यानंतर, प्रत्येक लोकस मेसेजसाठी 1 रुपये आणि प्रति राष्ट्रीय मेसेजसाठी 1.5 रुपये भरावे लागतील.

या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग मिळतात. हे 28 दिवसांसाठी Xstream मोबाइल पॅक, प्राइम व्हिडिओ मोबाइल एडिशनचा 30-दिवसीय ट्रायल पॅक (प्रत्येक वापरकर्त्यासाठी एकदा), Circle मेंबरशिप, Shaw Academy फ्री अभ्यासक्रम, फ्री HelloTunes आणि फ्री विंक म्युझीक यासह इतर अनेक बेनिफिट्ससह येतो.

हेही वाचा: लाँच झालं आणखी एक स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर; पाहा किंमत अन् फीचर्स

इतर कंपन्यांचे प्लॅन कसे आहेत?

Jio कडे 2.5GB डेली डेटासाठी कोणताही प्लॅन नाही, परंतु कंपनी 419 रुपयांमध्ये 3GB डेली हाय-स्पीड प्लॅन ऑफर करते. या प्लॅनची ​​वैधता 28 दिवसांची आहे आणि यामध्ये अमर्यादित कॉलिंगसह दररोज 100 मोफत एसएमएस देखील मिळतात.

त्याच वेळी, Vi चा 409 रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लॅन आहे, जो Airtel प्रमाणे 2.5GB डेली डेटा ऑफर करतो. या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंगसोबतच दररोज 100 मोफत एसएमएसचाही लाभ मिळतो. Vi आपल्या वापरकर्त्यांना डेटा कॅरी फॉरवर्ड करण्याचा पर्याय तसेच 2GB पर्यंत डेटा बॅकअप देते.

हेही वाचा: Jio चे दोन नवीन WFH प्लॅन, दररोज 2.5GB डेटासह मिळतील 'हे' फायदे

Web Title: Airtel Cheapest 2 5gb Daily Data Prepaid Plan For 28 Days Check Caparison With Jio Vi Plans

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :AirtelPrepaid Plan