Airtel, Jio अन् Vi चे ३६५ दिवसांचे प्लॅन; फ्री डेटासह मिळेल बरंच काही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

airtel jio vodafone idea daily 2gb data prepaid plan with 365 validity check details

Airtel, Jio अन् Vi चे ३६५ दिवसांचे प्लॅन; फ्री डेटासह मिळेल बरंच काही

तुम्ही तुमच्यासाठी वार्षिक वैधता असलेला नवीन प्रीपेड प्लॅन शोधत असाल, तर आम्ही तुमच्यासाठी Vodafone Idea चा प्रीपेड प्लान घेऊन आलो आहोत. होय, Vodafone Idea च्या या प्लॅनमध्ये वर्षभरासाठी दररोज 2 GB डेटा मिळतो, अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि इतर फायदे देखील मिळतात. आज आपण 365 दिवसांची वॅलिडीटी असलेल्या Jio आणि Airtel च्या प्लॅनशी तुलना करणार आहोत. (airtel, jio and vodafone idea daily 2gb data prepaid plan with 365 validity)

व्होडाफोन आयडिया(Vi) चा 3,099 रुपयांचा प्लॅन

व्होडाफोन आयडियाचा 3,099 रुपयांचा प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटा दिला जातो. हाय स्पीड डेटा मर्यादा संपल्यानंतर इंटरनेट स्पीड 64Kbps पर्यंत कमी केला जातो. वैधतेबद्दल बोलायचे झाल्यास, या प्लॅनची ​​वैधता 365 दिवसांची आहे. तसेच या प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉईस कॉलिंग उपलब्ध आहे आणि प्लॅनमध्ये दररोज 100 एसएमएस देखील उपलब्ध आहेत. इतर फायद्यांबद्दल बोलायचे झाल्यास, या प्लॅनमध्ये डिस्ने + हॉटस्टार मोबाइल सबस्क्रिप्शन 1 वर्षासाठी उपलब्ध आहे. तसेच Binge ऑल नाईट डेटा उपलब्ध आहे, ज्यामध्ये डेटा रात्री 12 ते सकाळी 6 पर्यंत चालतो. या व्यतिरिक्त या प्लॅनमध्ये Vi Movies आणि TV VIP ऍक्सेस उपलब्ध आहे.

हेही वाचा: Johnson & Johnson : लहान मुलांच्या या पावडरची विक्री होणार बंद, जाणून घ्या प्रकरण

एअरटेल(Airtel) चा 2,999 रुपयांचा प्लॅन:

एअरटेलच्या 2,999 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटा उपलब्ध आहे . या प्लॅनची ​​वैधता 365 दिवसांची आहे. व्हॉईस कॉलिंगबद्दल बोलायचे झाले तर या प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉईस कॉलिंग उपलब्ध आहे. तसेच दररोज 100 एसएमएस उपलब्ध आहेत. इतर फायद्यांमध्ये Apollo 24|7 Circle, FASTag वर रु. 100 कॅशबॅक, मोफत Hello Tunes आणि Wynk Music चा फ्री ऍक्सेस यांचा समावेश आहे.

हेही वाचा: Honda लवकरच भारतात लॉंच करणार पहिली इलेक्ट्रिक स्कूटर, जाणून घ्या डिटेल्स

जिओ(Jio) चा 2,999 रुपयांचा प्लॅन

जिओचा 2,999 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज 2.5GB डेटा दिला जातो, जो एकूण 912.5GB डेटा आहे. हाय स्पीड डेटा मर्यादा संपल्यानंतर इंटरनेट स्पीड 64Kbps पर्यंत कमी केला जातो. वैधतेबद्दल बोलायचे झाल्यास, या प्लॅनची ​​वैधता 365 दिवसांची आहे. व्हॉईस कॉलिंगसाठी, या प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉइस कॉलिंग उपलब्ध असून सोबत दररोज 100 एसएमएस उपलब्ध आहेत. इतर फायद्यांसाठी, या प्लॅनमध्ये Jio अॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे.

टॅग्स :JioAirtelPrepaid Plan