OTT प्रेमींसाठी खुशखबर! एकाच रिचार्जमध्ये Netflix, JioCinema अन् Zee5; 'या' बड्या कंपनीने आणला धमाकेदार प्लॅन, किंमत फक्त..

Airtel OTT Plans Netflix, JioCinema and Zee5 Subscription : एयरटेलने तीन नवीन प्रीपेड प्लॅन्स सादर केले असून त्यात Netflix, JioCinema आणि Zee5 च्या मोफत सदस्यता मिळतात.
Airtel OTT Plans Netflix, JioCinema and Zee5 Subscription
Airtel OTT Plans Netflix, JioCinema and Zee5 Subscriptionesakal
Updated on

एयरटेलने आपल्या ग्राहकांसाठी मनोरंजनाचा खजिना उघडला आहे. आता Netflix, JioCinema आणि Zee5 यांसारख्या लोकप्रिय OTT अ‍ॅप्ससाठी वेगवेगळ्या सबस्क्रिप्शनचा खर्च टाळा कारण Airtel ने एकाच रिचार्जमध्ये या सर्व सेवा मोफत देणारे तीन नवे प्रीपेड प्लॅन्स लाँच केले आहेत. या नव्या योजना केवळ डेटाच नव्हे, तर प्रेक्षकांना एकत्रित आणि दर्जेदार मनोरंजन अनुभव देण्यासाठी तयार करण्यात आल्या आहेत.

या नव्या योजनांमध्ये Netflix Basic ची सदस्यता सर्व डिव्हाइसेससाठी मोफत दिली जात आहे. तसेच, JioCinema चा Super Plan, Zee5 Premium आणि Airtel Xstream Play Premium यांचा समावेश आहे. Airtel Xstream Play Premium द्वारे वापरकर्त्यांना २५ हून अधिक OTT प्लॅटफॉर्म्सवरचा कंटेंट सहज उपलब्ध होतो.

279 प्लॅन रुपये

हे डेटा-पॅक स्वरूपातील प्लॅन आहे ज्यात वापरकर्त्यांना 1GB डेटा मिळतो. त्यासोबत Netflix Basic, JioCinema Super Plan, Zee5 Premium आणि Airtel Xstream Play Premium यांचा समावेश आहे. हा प्लॅन कमी किंमतीत संपूर्ण OTT मनोरंजन देतो आणि त्याची वैधता 30 दिवसांची आहे.

Airtel OTT Plans Netflix, JioCinema and Zee5 Subscription
Digital Footprints : फोटो, मेसेज, सोशल मीडिया...मृत्यूनंतर तुमच्या डिजिटल फुटप्रिंटचं काय होतं? असं करा सुरक्षित

589 प्लॅन प्लॅन रुपये

या प्लॅनमध्ये Netflix Basic, JioCinema Super Plan, Zee5 Premium आणि Airtel Xstream Play Premium या सर्व सेवा मिळतात. त्याशिवाय यामध्ये दररोज 2GB हाय-स्पीड डेटा, अनलिमिटेड 5G डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगसह दररोज 100 SMS देखील मिळतात. प्लॅनची वैधता 28 दिवस आहे.

1729 प्लॅन रुपये

ज्यांना जास्त दिवसांचा प्लॅन हवा आहे, त्यांच्यासाठी हा प्लॅन बेस्ट आहे. 84 दिवसांची वैधता असलेल्या या प्लॅनमध्ये वरील सर्व OTT सेवा मिळतात. यामध्ये Netflix Basic, Zee5 Premium, JioCinema Super Plan आणि Airtel Xstream Play Premium यांचा समावेश आहे. याशिवाय दररोज 2GB डेटा, अनलिमिटेड 5G डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 SMS मोफत दिले जातात.

Airtel OTT Plans Netflix, JioCinema and Zee5 Subscription
Realme GT 7 Launch : खुशखबर! लॉन्च झाला Realme GT 7; बजेटमध्ये दमदार फीचर्स अन् ब्रँड कॅमेरा, एकदा बघाच..

एयरटेलचा हा नवा प्लॅन OTT क्षेत्रातील स्पर्धेला उत्तर देणारा ठरतो आहे. यामुळे ग्राहकांना वेगवेगळ्या अ‍ॅप्ससाठी वेगवेगळे रिचार्ज करण्याची गरज उरलेली नाही. एकाच रिचार्जमध्ये सर्व काही मिळवण्याची संधी एयरटेलने ग्राहकांना दिली आहे.

मनोरंजन, इंटरनेट आणि कॉलिंग सर्व काही एका प्लॅनमध्ये.. मग वाट कसली पाहताय, एयरटेलचे हे नवे प्लॅन्स आजच वापरून पहा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com