Airtel च्या 'या' पोस्टपेड प्लॅन्ससोबत मिळतंं फ्री नेटफ्लिक्स सब्सक्रिप्शन

airtel offering free netflix with these postpaid plans know details here
airtel offering free netflix with these postpaid plans know details here
Updated on

रिलायन्स जिओ आणि व्होडाफोन प्रमाणे, एअरटेल देखील नेटफ्लिक्स सब्सक्रिप्शन अनेक फ्री OTT सब्सक्रिप्शन असलेले काही पोस्टपेड प्लॅन ऑफर करते. मोफत Netflix ऑफर करणार्‍या या Airtel पोस्टपेड प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉईस कॉलिंग, 4G डेटा यांसारखी बेनिफीट्स आहेत. चला तर मग Airtel च्या त्या पोस्टपेड प्लॅन्सबद्दल जाणून घेऊ या, जे Netflix चे फ्री सब्सक्रिप्शन देतात.

1199 रुपयांचा प्लॅन

हा पोस्टपेड प्लॅन 30 दिवसांच्या वैधतेसह 150GB डेटा रोलओव्हर ऑफर करतो. यात 1 नियमित आणि 2 इतर कौटुंबिक अॅड-ऑन देखील समाविष्ट आहेत. याशिवाय, या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग, दररोज 100 एसएमएस, नेटफ्लिक्स बेसिक प्लॅनचे मोफत सबस्क्रिप्शन, अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ आणि डिस्ने + हॉटस्टार मोबाइल ऑफर केले जात आहेत. याशिवाय, हे एअरटेल एक्सस्ट्रीमचे बेनिफीट्, आणि हँडसेट सेक्युरिटी प्लॅन ऑफर करते.

1599 रुपयांचा प्लॅन

हा पोस्टपेड प्लॅन मासिक रेंटल व्हॅलिडीटीसह 250GB डेटा रोलओव्हर ऑफर करतो. यामध्ये 1 नियमित आणि 3 इतर कौटुंबिक अॅड-ऑन देखील समाविष्ट आहेत. हा प्लॅन अमर्यादित कॉलिंग, दररोज 100 SMS आणि Netflix स्टँडर्ड प्लॅन, Amazon Prime Video आणि Disney+ Hotstar Mobile चे मोफत सबस्क्रिप्शन ऑफर करतो. याशिवाय, हे एअरटेल एक्सस्ट्रीम फायदे आणि हँडसेट सेक्युरिटी प्लॅन देखील ऑफर करते.

airtel offering free netflix with these postpaid plans know details here
कोर्टाने न्यायलयीन कोठडी सुनावल्यानंतर KRK रुग्णालयात दाखल

महत्वाचे म्हणजे फक्त Airtelच नाही तर Reliance Jio आणि Vi सारख्या दूरसंचार ऑपरेटर देखील त्यांच्या काही प्लॅनसह मोफत Netflix सबस्क्रिप्शन ऑफर करतात.

रिलायन्स जिओ 399 रुपये, 599 रुपये आणि 799 रुपये किंमतीच्या तीन पोस्टपेड प्लॅनसह फ्री Netflix सबस्क्रिप्शनऑफर करते. या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉल आणि इतर अनेक फायदे आहेत. दुसरीकडे, Vodafone Idea, 1099 रुपयांच्या प्लॅनमध्ये फ्री Netflix सबस्क्रिप्शनसह पोस्टपेड प्लॅन ऑफर करते.

airtel offering free netflix with these postpaid plans know details here
Jio चे दमदार रीचार्ज प्लॅन, फ्री ओटीटी सबस्क्रिप्शन मिळेल 150GB डेटा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com