Airtel Vs Vi: 199 रुपयांचा कोणाचा प्लॅन आहे बेस्ट? येथे जाणून घ्या सर्वकाही

Airtel Vs Vi Plan
Airtel Vs Vi Plan

एअरटेलने नुकताच आपला 119 रुपयांचा प्रीपेड प्लॅन लॉन्च केला आहे. यासह, एअरटेलने ग्राहकांना 30 दिवसांच्या वैधतेसह एक नवीन पर्याय दिला आहे. पण Vodafone Idea आधीच 199 रुपयांचा प्लॅन ऑफर करत आहे. आज या दोन कंपन्यांच्या प्लॅनची तुलना करणार आहोत. त्यामुळे कोणती कंपनी आपल्या ग्राहकांना एकाच किंमतीत अधिक फायदे देत आहे, हे सहजपणे ठरवता येईल.

Vodafone Idea च्या 199 रुपयांच्या प्लॅनमध्ये काय मिळतं?

ग्राहकांना 18 दिवसांची वैधता आणि 1GB दैनिक डेटासह Vi ही 199 रुपयांचा प्रीपेड प्लॅन ऑफर करते. या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस मिळतात. अतिरिक्त फायद्यांमध्ये, Vi वापरकर्त्यांना Vi Movies आणि TV मध्ये एक्सेस मिळतो. FUP डेटा मर्यादा संपल्यानंतर, इंटरनेट स्पीड 64 Kbps पर्यंत कमी होईल. या प्लॅनमध्ये युजर्सना मिळणारा एकूण हाय-स्पीड डेटा 18GB आहे.

Airtel Vs Vi Plan
Shivsena: ठाकरे गटाची पडझड थांबेना! गजानन किर्तिकरांचा शिंदे गटात जाहीर प्रवेश

एअरटेलच्या नवीन 199 रुपयांच्य प्लॅनमध्ये काय मिळतं?

एअरटेलचा नवीन 199 रुपयांचा प्रीपेड प्लॅन पूर्ण 30 दिवसांची वैधता देते. प्लॅनमध्ये 30 दिवसांसाठी एकूण 3GB डेटा उपलब्ध आहे. टा मर्यादा संपल्यानंतर, तुम्हाला 1MB डेटासाठी 50 पैसे खर्च करावे लागतील. याशिवाय प्लॅनमध्ये 30 दिवसांसाठी या प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि फक्त 300 एसएमएस देखील उपलब्ध आहेत. प्लॅनमध्ये उपलब्ध असलेल्या अतिरिक्त फायद्यांपैकी, मोफत वापरकर्त्यांना विंक म्युझिक, मोफत HelloTunes चा एक्सेस देखील मिळतो.

Airtel Vs Vi Plan
Jitendra Awhad: आव्हाडांवर अजून कलमं लावा…; वादात उडी घेत केतकी चितळेचं पोलिसांना पत्र

हे पाहता एअरटेलचा प्लॅन ग्राहकांना कमी डेटा देतो परंतु Vi सारख्याच किंमतीच्या प्लॅनमध्ये अधिक वैधता मिळते. Vi चा प्लॅन 18 दिवसांच्या वैधतेसह येतो, तर Airtelचा प्लॅन 30 दिवसांची वैधता देतो. म्हणजेच दोन्ही प्लॅन ग्राहकांच्या वेगवेगळ्या गरजा पूर्ण करतात. एअरटेलचा प्लॅन अशा यूजर्ससाठी चांगला आहे ज्यांना एक महिन्याची वैधता आणि अमर्यादित कॉलिंग हवे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com