Airtel, Vi च्या नव्या किंमती लागू; किती वाढले दर? वाचा सविस्तर | Airtel Vs Vodafone Idea | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

airtel vodafone idea new recharge plan prices

Airtel, Vi च्या नव्या किंमती लागू; किती वाढले दर? वाचा सविस्तर

Airtel आणि Vodafone Idea, भारतातील दोन सर्वात मोठ्या टेलिकॉम कंपन्यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला प्रीपेड प्लॅनच्या त्यांच्या दरात वाढ केली. आता कंपन्यांना जुन्या प्लॅन साठी रिचार्ज करणाऱ्यांसाठी देखील दोन्ही कंपन्यांनी नवीन किमती आता लागू केल्या आहेत आणि आता कोणीही त्यांच्या नंबरवर रिचार्ज करत असतील तर त्यांना नवीन वाढलेली किंमत भारावी लागणार आहे.

आज आपण तुम्हाला तुमच्या Airtel आणि Vodafone प्रीपेड प्लॅन्सवर किती पैसे खर्च करावे लागतील ते पाहाणार आहोत. Airtel आणि Vodafone Idea या दोन्हींवर 79 रुपये किमतीच्या बेस व्हॉईस प्लॅनची ​​किंमत आता 99 रुपये आहे आहे. यात 50 टक्के अधिक मिनिटे व्हॉइस कॉलिंग तसेच 200MB डेटा आणि 28 दिवसांची वैधता देण्यात येते.

Airtel आणि Vi चे 28-दिवसांचे प्लॅन

Airtel आणि Vodafone Idea च्या 149 रुपयांच्या प्लॅनची ​​किंमत आता 179 रुपये असेल. तर दोन्ही प्लॅनमध्ये अनलिमीटेड व्हॉइस कॉलिंग आणि एकूण 2GB डेटा मिळेल. तसेच हा प्लॅन 28 दिवसांसाठी वैध आहे.

Airtel आणि Vodafone Idea च्या 219 प्लॅनची ​​किंमत आता अनुक्रमे 265 आणि 269 रुपये झाली आहे, जे 28 दिवसांसाठी अमर्यादित कॉलिंग आणि 1GB डेटा प्रतिदिन ऑफर करतात. तर 249 रुपयांच्या प्लॅनची ​​किंमत आता Airtel आणि Vodafone Idea या दोन्हीसाठी 299 रुपये आहे. प्लॅनमध्ये 28 दिवसांसाठी दररोज 1.5GB डेटासह अमर्यादित कॉलिंगची सुविधा दिली जाते.

Airtel वर 298 आणि Vodafone Idea वरील 299 रुपयात मिळणाऱ्या प्लॅनची ​​किंमत आता 359 झाली असून आता 28 दिवसांसाठी दररोज 2GB डेटासह अमर्यादित कॉलिंग ऑफर केला जातो.

हेही वाचा: बजेटमध्ये मिळतात 'या' सर्वात जास्त मायलेज देणार्‍या एसयूव्ही

Airtel आणि Vi चे 56 दिवसांचे प्लॅन्स

Airtel आणि Vodafone Idea या दोन्हींवरील 399 रुपयांच्या प्लॅनची ​​किंमत आता 479 रुपये आहे आणि 56 दिवसांसाठी अमर्यादित व्हॉइस कॉलिंगसह दररोज 1.5GB डेटा ऑफर केला जातो. तर 449 रुपयांच्या प्लॅनची ​​किंमत आता Airtel वर 549 रुपये आणि Vodafone Idea वर 539 रुपये आहे. प्लॅनमध्ये 56 दिवसांसाठी दररोज 2GB डेटा आणि त्याच कालावधीसाठी अमर्यादित व्हॉईस कॉलिंग ऑफर केले जाते.

Airtel आणि Vi चा 84 दिवसांचा प्लॅन

379 रुपयांच्या प्लॅनची ​​किंमत आता Airtel वापरकर्त्यांसाठी 455 रुपये आणि Vodafone Idea वापरकर्त्यांसाठी 459 रुपये आहे. हे एकूण 6GB डेटा तसेच 84 दिवसांच्या कालावधीसाठी अमर्यादित कॉलिंग ऑफर करतात.

Airtel वर 598 आणि Vodafone Idea वर 599 रुपयांचा प्लॅन आता दोन्ही ऑपरेटर्ससाठी 719 रुपयांना मिळेल तसेच या प्लॅनमध्ये 84 दिवसांसाठी अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 1.5GB डेटा ऑफर केला जातो. त्याचप्रमाणे, Airtel वरील 698 आणि Vodafone Idea वरील 699 प्लॅनची ​​किंमत आता दोन्ही ऑपरेटर्सनी वाढवून 839 रुपय केली आहे आणि यामध्ये तुम्हाला 84 दिवसांसाठी अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि 2GB डेटा प्रतिदिन येतो.

हेही वाचा: तुमची डिझेल कार कनव्हर्ट करा इलेक्ट्रिकमध्ये; जाणून घ्या पध्दत

Airtel आणि Vi चा एक वर्षांचा प्लॅन

Airtel वर 1,498 आणि Vodafone Idea वर 1,499 च्या प्लॅनची ​​किंमत आता1,799 असेल आणि त्यात 365 दिवसांसाठी अमर्यादित कॉलिंग आणि एकूण 24GB डेटा देण्यात येतो

एअरटेलवरील 2,498 रुपयांच्या प्लॅनची ​​किंमत आता 2,999 रुपये आहे आणि Vodafone Idea वरील 2,399 रुपयांच्या प्लॅनची ​​किंमत आता 2,899 रुपये आहे. दोन्ही प्लॅन 365 दिवसांसाठी अमर्यादित कॉलिंग आणि प्रति दिन 2GB डेटा देतात.

डेटा बूस्टर पॅक

Airtel आणि Vodafone Idea वर 48 रुपये किमतीच्या 3GB डेटा प्लॅनची ​​किंमत आता 58 रुपये झाली असून दोन्ही ऑपरेटरसाठी 98 रुपये किंमत असलेल्या 12GB डेटा प्लॅनची ​​किंमत आता 118 रुपये आहे.

50GB प्लॅन ज्याची किंमत पूर्वी दोन्ही ऑपरेटर्ससाठी 251 रुपये होती, आता एअरटेलवर त्या रिचार्जसाठी 301 रुपये आणि Vodafone Idea वर 298 रुपये मोजावे लागतील. लक्षात घ्या की या प्लॅनची ​​Airtel वर अमर्याद वैधता आहे, परंतु Vodafone Idea वर, ते 28 दिवसांसाठीच वैध आहेत. याव्यतिरिक्त, Vodafone Idea 100GB डेटा प्लॅन ऑफर करते जे 56 दिवसांसाठी वैध आहे आणि त्याची किंमत 418 रुपये आहे.

loading image
go to top