तुमची डिझेल कार कनव्हर्ट करा इलेक्ट्रिकमध्ये; जाणून घ्या सोपी पध्दत | Electric Car | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Electric Car

तुमची डिझेल कार कनव्हर्ट करा इलेक्ट्रिकमध्ये; जाणून घ्या पध्दत

वाढते हवा प्रदूषण आणि पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे इलेक्ट्रिक वाहनांकडे ग्राहकांचा कल वाढताना दिसत आहे. पेट्रोल-डिझेलचे दर सामान्य लोकांना परवडण्याच्या पलिकडे जात आहेत, तसेच अशा कार वापरल्याने प्रदुषण देखील मोठ्या भर पडते त्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांचा पर्याय सध्या बेस्ट ठरतो. तसेच प्रदुषण कमी करण्यासाठी दिल्ली सारख्या शहरात 10 वर्षांपेक्षा जुन्या डिझेल वाहनांवर बंदी देखील घालण्यात आली आहे. अशा परिस्थितीत तुम्ही डिझेल कार सोडून इलेक्ट्रिक कार घेण्याचा विचार करत असाल, तर तुमच्याकडे नवी कार घेण्याएवजी आणखी एक पर्याय उपलब्ध आहे.

डिझेल कार इलेक्ट्रिक मध्ये कनव्हर्ट करा

तुमची डिझेल कार इलेक्ट्रिकमध्ये कनव्हर्ट करण्यासाठी तुम्हाला इंधन किटऐवजी कारमध्ये ई-मोटर आणि बॅटरी बसवावी लागेल. कोणत्याही सामान्य कारला इलेक्ट्रिक कारमध्ये रूपांतरित करण्यासाठी, मोटर, कंट्रोलर, रोलर आणि बॅटरीची आवश्यकता असते. त्यासाठी किती खर्च येईल हे किती kWh ची बॅटरी आणि किती kWh ची मोटर तुम्हाला कारमध्ये बसवायची आहे यावर अवलंबून असतो, कारण हे दोन्ही पार्ट कारची पावर आणि एका चार्जवर कार किती किमी चालेल यासाठी जबाबदार असतात. उदाहरणार्थ, सुमारे 20 किलोवॅट क्षमतेच्या इलेक्ट्रिक मोटर आणि 12 किलोवॅट क्षमतेच्या लिथियम-आयन बॅटरीची किंमत सुमारे 4 लाख रुपये आहे. त्याचप्रमाणे, जर बॅटरी 22 किलोवॅटची असेल तर हा खर्च सुमारे 5 लाख रुपयांपर्यंत वाढतो.

बचतीची संधी

तुमची पेट्रोल किंवा डिझेल कार इलेक्ट्रिक कारमध्ये बदलण्यासाठी तुम्ही 5 लाख रुपये खर्च करता आणि त्यानंतर ती कार एकजा चार्ज केल्यानंतर 75 किमी चालू शकते, त्यानंतर काही महिन्यांमध्येच तुमचे पैसे वसूल होतील आणि नंतर खूप बचत देखील होईल.

टॅग्स :Automobile