Airtel, Jio की Vi? 84 दिवसांचा कोणाचा प्लॅन देतो सर्वाधिक फायदे, वाचा

airtel vs jio vs vi Recharge plan
airtel vs jio vs vi Recharge planRecharge plan

airtel vs jio vs vi recharge plans : देशातील आघाडीच्या दूरसंचार कंपन्या Jio , Airtel आणि Vodafone Idea त्यांच्या वापरकर्त्यांसाठी 1 दिवसापासून ते 365 दिवसांची वैधता असलेले असंख्य प्रीपेड प्लॅन ऑफर करतात. जर तुम्हाला स्वतःसाठी मासिक प्लॅन घ्यायचा नसेल आणि एक वर्षाचा मोठा प्लॅन देखील नको असेल तर 84 दिवसांच्या वैधतेचा रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट ठरू शकतो. 84 दिवसांच्या रिचार्ज प्लॅनचे बेनिफिट्स हे बहुतांश वापरकर्त्यांच्या गरजा भागवतात. देशातील तीन नेटवर्क कंपन्या Airtel, Jio आणि Vodafone Idea भारतात 84-दिवसांचे प्रीपेड प्लॅन ऑफर करतात ज्यामध्ये अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि मोफत एसएमएससह डेटा मिळतो.

Airtel चे 84 दिवसांचे प्लॅन्स

एअरटेलचा 455 रुपयांचा रिचार्ज प्लॅन : एअरटेलच्या 455 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये एकूण 6GB डेटा येतो. व्हॉईस कॉलिंगबद्दल बोलायचे झाले तर या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग देण्यात आले आहे. या प्लॅनमध्ये एकूण 900 फ्री SMS दिले आहेत. तसेच प्लॅनमध्ये Prime Video Mobile Edition एडिशन सबस्क्रिप्शन 1 महिन्यासाठी दिले जाते. या व्यतिरिक्त Apollo 27/7 Circle, Shaw Academy कडून मोफत ऑनलाइन कोर्सेस, FASTag वर 100 रुपये कॅशबॅक, मोफत Hello Tunes आणि मोफत Wynk म्युझिक या प्लॅनमध्ये 3 महिन्यांसाठी दिले जाते. या प्लॅनमध्ये 84 दिवसांची वैधता मिळते

एअरटेलचा 719 रुपयांचा रिचार्ज प्लॅन : एअरटेलच्या 719 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये दररोज 1.5GB डेटा दिला जातो. तसेच या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग उपलब्ध आहे. एसएमएससाठी, या प्लॅनमध्ये दररोज 100 मोफत एसएमएस उपलब्ध आहेत. या प्लॅनमध्ये तुम्हाला प्राइम व्हिडिओ मोबाइल एडिशनचे सबस्क्रिप्शन 1 महिन्यासाठी उपलब्ध आहे. सोबतच Apollo 27/7 Circle, Shaw Academy कडून मोफत ऑनलाइन कोर्सेस, FASTag वर 100 रुपये कॅशबॅक, मोफत Hello Tunes आणि मोफत Wynk म्युझिक या प्लॅनमध्ये 3 महिन्यांसाठी दिले जाते. या प्लॅनमध्ये 84 दिवसांची वैधता मिळते

एअरटेलचा 839 रुपयांचा रिचार्ज प्लॅन : एअरटेलचा 839 रुपयांचा रिचार्ज प्लॅन दररोज 2GB डेटा ऑफर करतो. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग देण्यात आले आहे. तसेच दररोज 100 फ्री एसएमएस दिले जातात. इतर फायद्यांबद्दल बोलायचे झाल्यास, एअरटेलच्या या प्लॅनमध्ये प्राइम व्हिडिओ मोबाइल एडिशनचे 1 महिन्यासाठी सबस्क्रिप्शन,सोबतच Apollo 27/7 Circle, Shaw Academy कडून मोफत ऑनलाइन कोर्सेस, FASTag वर 100 रुपये कॅशबॅक, मोफत Hello Tunes आणि मोफत Wynk म्युझिक या प्लॅनमध्ये 3 महिन्यांसाठी दिले जाते. या प्लॅनमध्ये 84 दिवसांची वैधता मिळते

airtel vs jio vs vi Recharge plan
वाहनात CNG किट बसवण्यासाठी नवे नियम, 'या' गाड्यांना मिळणार परवानगी

Vodafone Idea चे 84 दिवसांचे प्लॅन्स

Vodafone Idea चा 459 रुपयांचा रिचार्ज प्लॅन : Vodafone Idea च्या 459 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये एकूण 6GB डेटा दिला जातो. व्हॉईस कॉलिंगच्या रूपात या प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉईस कॉलिंग देण्यात आले आहे. SMS बद्दल बोलायचे झाले तर, या प्लॅनमध्ये एकूण 1000 मोफत SMS देण्यात आले आहेत. हा प्लान 84 दिवसांचा आहे. इतर फायद्यांबद्दल बोलायचे झाल्यास, या प्लॅनमध्ये Vi movies and TV बेसीक एक्सेस देण्यात आला आहे.

Vodafone Idea चा 719 रुपयांचा रिचार्ज प्लॅन : या प्लॅनमध्ये दररोज 1.5GB डेटा मिळतो, व्हॉईस कॉलिंगबद्दल बोलायचे झाले तर या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग देण्यात आले आहे. सोबत दररोज मोफत 100 एसएमएस दिले जातात. वैधतेबद्दल बोलायचे झाल्यास, या प्लॅनमध्ये 84 दिवसांची वैधता आहे. इतर फायद्यांच्या बाबतीत, हा प्लॅन Vi movies and TV चा बेसिक एक्सेस, बिंग ऑल नाईट, वीकेंड डेटा रोलओव्हर आणि दरमहा 2GB डेटा बॅकअप ऑफर करतो.

Vodafone Idea चा 839 रुपयांचा रिचार्ज प्लॅन : व्होडाफोन आयडियाच्या 839 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटा दिला जातो. व्हॉईस कॉलिंगच्या स्वरूपात, या प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉइस कॉलिंग मिळतो सोबत दररोज 100 मोफत एसएमएस दिले जातात. वैधतेबद्दल बोलायचे झाले तर, हा प्लॅन 84 दिवसांचा आहे. तसेच हा Vi movies and TV चा बेसिक एक्सेस, बिंग ऑल नाईट, वीकेंड डेटा रोलओव्हर आणि दरमहा 2GB डेटा बॅकअप ऑफर करतो.

airtel vs jio vs vi Recharge plan
रेल्वे स्टेशनची नावे पिवळ्या बोर्डवरच का लिहीतात? जाणून घ्या खास कारण

Jio चे 84 दिवसांचे प्लॅन्स

जिओचा 666 रुपयांचा रिचार्ज प्लान: जिओच्या 666 रुपयांच्या रिचार्ज प्लानमध्ये दररोज 1.5 जीबी डेटा मिळतो, त्यानंतर स्पीड 64 केबीपीएसपर्यंत कमी होतो. या प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉईस कॉलिंग दिले जाते सोबत दररोज 100 मोफत एसएमएस दिले जातात. वैधतेबद्दल बोलायचे झाले तर, हा प्लान 84 दिवसांचा आहे. इतर फायदे पाहता, Jio TV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud सबस्क्रिप्शन या प्लॅनमध्ये उपलब्ध आहेत.

जिओचा 719 रुपयांचा रिचार्ज प्लॅन : जिओच्या 719 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटा दिला जातो. हाय स्पीड डेटा मर्यादा पूर्ण झाल्यावर इंटरनेट 64 Kbps च्या वेगाने चालते. या प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100 मोफत एसएमएस देण्यात आले आहेत. हा प्लॅन 84 दिवसांसाठी चालतो. इतर फायद्यांच्या बाबतीत, या प्लॅनमध्ये Jio TV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud सबस्क्रिप्शन उपलब्ध आहेत.

Jio चा 1,066 रुपयांचा रिचार्ज प्लॅन : Jio च्या या रिचार्ज प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटा येतो आणि त्यानंतर इंटरनेट स्पीड 64 Kbps होतो. यात 5 GB अतिरिक्त डेटा देखील मिळतो आणि एकूण 173 GB डेटा शिल्लक राहतो. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा देण्यात आली आहे. तसेच दररोज 100 मोफत एसएमएस दिले जातात. वैधतेबद्दल बोलायचे झाल्यास, या प्लॅनमध्ये 84 दिवसांची वैधता उपलब्ध आहे. इतर फायद्यांबद्दल सांगायचे तर, या प्लॅनमध्ये Jio अॅप्स आणि Jio TV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud सारख्या सेवांचे सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे. सोबत डिस्ने + हॉटस्टार मोबाइल सबस्क्रिप्शन या प्लॅनमध्ये 1 वर्षासाठी मिळते.

Jio चा 1,199 रुपयांचा रिचार्ज प्लॅन : Jio च्या रु. 1,199 रिचार्ज प्लॅनमध्ये दररोज 3GB डेटा येतो, जो पूर्ण झाल्यावर इंटरनेटचा स्पीड 64 Kbps राहील. या प्लॅनमध्ये एकूण 252GB डेटा मिळतो. या प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉइस कॉलिंग येते. या प्लॅनमध्ये दररोज 100 मोफत एसएमएस दिले जातात. वैधतेबद्दल बोलायचे झाले तर, हा प्लॅन 84 दिवसांचा आहे. इतर फायदे पाहता, हा प्लॅन Jio अॅप्स आणि Jio TV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud सारख्या सेवांच्या सबस्क्रिप्शनसह येतो.

airtel vs jio vs vi Recharge plan
स्वस्तात खरेदी करा Micromax In Note 2; पाहा किंमत, स्पेसिफिकेशन्स

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com