Airtel: एअरटेलच्या स्वस्त 5G प्लॅनमुळे वाढलं जिओचे टेन्शन! 'इतकी' असेल किंमत

airtel will launch affordable 5g plan with price same as 4g to compete jio
airtel will launch affordable 5g plan with price same as 4g to compete jio google

एअरटेल आता 5G साठी खूप आक्रमक भूमिका घेत असल्याचं दिसतंय. 4G मध्ये टॉपला असणाऱ्या जिओला 5G टेक्नॉलॉजी मध्ये मागे सोडण्याचा चंग एअरटेलने बांधल्याचं दिसतंय. यामुळेच जिओच्या तुलनेत एअरटेलने लवकरच 5G नेटवर्क लाँच केलं, यासोबतच एअरटेलने 5G रिचार्ज प्लान लॉन्च करण्याची घोषणा केली आहे.

याबाबत सांगतात एअरटेलने स्पष्ट केलंय की, त्यांचे 5G रिचार्ज प्लॅन्स अत्यंत स्वस्त आणि वाजवी दरात उपलब्ध करून दिले जातील. असं म्हटलं जातंय की, एअरटेल 4G चे रिचार्ज प्लॅन्स आणि 5 G चे रिचार्ज प्लॅन्स यात जास्त तफावत ठेवणार नाहीये. त्यामुळे एअरटेल युजर्सना हे प्लॅन परवडणाऱ्या दरात असतील असं तरी दिसतंय. लवकरच 5G चे टॅरिफ प्लॅन लाँच केले जातील.

airtel will launch affordable 5g plan with price same as 4g to compete jio
Airtel 5G Plus: आठ शहरांमध्ये लाँच झाली सेवा, येथे जाणून घ्या सर्वकाही

भारतात सध्या 10 टक्के 5G स्मार्टफोन

भारतात एकूण स्मार्टफोनपैकी फक्त 10 टक्के स्मार्टफोन हे 5G स्मार्टफोन आहेत. त्यामुळे एअरटेल या 10 टक्के युजर्सना परवडणारा 5G अनुभव देऊ इच्छित आहे. मार्च 20323 अखेर पर्यंत बाजारात एकूण 20 टक्के 5G स्मार्टफोन येण्याची शक्यता आहे. स्मार्टफोन कंपन्या 12000 रुपयांमध्ये एक नवीन स्मार्टफोन लॉन्च करू शकतात. दुसरीकडे अ‍ॅपलचा आयफोन 14 लाँच झाला आहे. या फोनला 5G सपोर्ट सॉफ्टवेअर अपडेट देण्यासाठी एअरटेल अँपलच्या सतत संपर्कात आहे.

airtel will launch affordable 5g plan with price same as 4g to compete jio
Whatsapp Feature: आता व्हॉट्सअ‍ॅपवर घेता येणार नाही 'स्क्रीनशॉट'!

Jio आणि Airtel ची 5G सेवा सुरु

1 ऑक्टोबर 2022 रोजी एअरटेलने देशातील निवडक शहरांमध्ये 5G सेवा सुरू केली होती. एअरटेलने आत्तापर्यंत एकूण 8 शहरांमध्ये 5G सेवा सुरू केली आहे. यामध्ये दिल्ली, वाराणसी, मुंबई, बंगळुरू या शहरांचा समावेश आहे.

मार्च 2023 अखेरपर्यंत भारतातील 50 ते 60 शहरांपर्यंत पोहोचण्याचं एअरटेलचं उद्दिष्ट आहे. तर मार्च 2024 पर्यंत देशभरात 5G कनेक्टिव्हिटी लाँच करण्याची क्षमता विकसित करण्याचे एअरटेलचे प्रयत्न सुरू आहेत. हीच 5G सेवा जिओने देखील लाँच केली आहे. मात्र जिओची सर्व्हिस वापरायची असेल तर तुमचा फोनही 5G असणं आवश्यक आहे. तरच जुन्या सिमला 5G कनेक्टिव्हिटी मिळेल.

airtel will launch affordable 5g plan with price same as 4g to compete jio
Google Pixel Watch: गुगलची पहिली पिक्सेल वॉच लॉंच; मिळणार अनेक दमदार फीचर्स

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com