
Beware of Online Gaming Risks Akshay Kumar Shares Daughter’s Cybercrime Experience
esakal
Online Gaming Safety Tips : ऑनलाइन गेमिंगच्या जगात तर खूपच मजा आणि धमाल आहे..पण त्याचबरोबर धोकेही लपलेले आहेत. नुकताच बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने त्याची मुलगी नितारासोबत, घडलेला एक धक्कादायक अनुभव सांगितला. एका ऑनलाइन गेमदरम्यान अनोळखी व्यक्तीने निताराला असभ्य मेसेज पाठवून तिच्याकडे न्यूड फोटो मागितले. सुदैवाने निताराने तात्काळ ही बाब आईला सांगितली आणि पुढील संकट टळले. पण अशा घटना सर्वांनाच सांगता येतात असे नाही. त्यामुळे ऑनलाइन गेम खेळताना सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.