
तिराना: जगभरात कृत्रिम बुद्धिमत्तेची (AI) चर्चा अजूनही टेक कंपन्या आणि रिसर्च लॅबपर्यंत मर्यादित आहे. अल्बानियाने मात्र या तंत्रज्ञानाला थेट राजकारणाच्या खुर्चीवर बसवले आहे. पंतप्रधान एडी रामा यांनी घोषणा केली आहे की, त्यांच्या नवीन मंत्रिमंडळात एक व्हर्च्युअल मंत्री असेल, ज्याचे नाव आहे 'डिएला'. अल्बानियन भाषेत 'डिएला'चा अर्थ 'सूर्य' असा होतो. डिएला ही कोणतीही व्यक्ती नसून, ती पूर्णपणे AI वर आधारित एक डिजिटल मंत्री आहे.