गुरूत्त्वीय लहरींद्वारे पुन्हा 'आइन्स्टाईन'च्या सिद्धांतांची परीक्षा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 जून 2020

या संशोधनामध्ये प्रचंड माहितीचे पृथक्करण करण्यात भारतीय शास्त्रज्ञांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. 

पुणे, ता. 24 ः अमेरिकेतील दोन अद्ययावत वेधशाळेंच्या माध्यामातून पुन्हा एकदा गुरूत्त्वीय लहरी टिपण्यात यश आले आहे. त्यामुळे ब्रह्मांडातील प्रचंड वस्तुमान असलेल्या पदार्थांच्या विलीनीकरणाच्या प्रक्रियेवर प्रकाश पडेल. या संशोधनामध्ये प्रचंड माहितीचे पृत्थक्करण करण्यात भारतीय शास्त्रज्ञांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

ऊर्जेचे उत्सर्जन करणाऱ्या ताऱ्यांपासून बनलेले कृष्णविवर (ब्लॅकहोल) आणि प्रचंड घनत्व असलेल्या खगोलीय पदार्थातून आलेल्या गुरूत्त्वीय लहरींचा अभ्यास यात करण्यात आला आहे. यामुळे पुन्हा एकदा अल्बर्ट आइन्स्टाईन यांच्या सामान्य सापेक्षतावाद सिद्धांताची परीक्षा घेण्यात आली आहे. 

एका सूर्यग्रहणामुळे आइन्स्टाईन झाले जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ

अमेरिकेतील लायगो आणि इटलीतील विर्गो येथील वेधशाळेच्या उपकरणांनी 15 ऑगस्ट 2019 ला पहाटे 2 वाजून 40 मिनिटांनी गुरूत्त्वीय लहरिंची नोंद घेतली होती. भारतीय तंत्रज्ञान संस्था गांधीनगर (आयआयटी) आणि चेन्नैई येथील मॅथेमॅटीकल इन्स्टिट्यूटच्या वैज्ञानिकांनी "डेटा ऍनॅलिसिस'मध्ये महत्त्वपूर्ण सहभाग आहे. 

Apple ची iPhone साठी नवी सिस्टिम, iOS 1 नंतर पहिल्यांदाच केला हा बदल

संशोधनाची वैशिष्ट्ये ः 
दोन प्रचंड महाकाय खगोलीय पदार्थांचे आकारमान 1 ः 9 प्रमाणात होते. वस्तूमानात एवढा फरक असलेली अशी घटना आजपर्यंत अभ्यासात आली नव्हती.  प्रचंड न्यूट्रॉन ताऱ्यापासून तयार झालेले सर्वांत कमी वस्तूमानाचे कृष्णविवर आहे. यातून प्रचंड घनत्व असलेल्या वस्तूमानाचे विलीनीकरण कसे होते यावर प्रकाश पडेल. 

गुगलने delete केलेले हे apps तुमच्या मोबाईलमध्ये असतील तर सावधान

या गोष्टींवर पडला प्रकाश ः 
- दोन न्यूट्रॉन ताऱ्यांच्या विलिनीकरणातून गुरूत्त्वीय लहरींबरोबरच मोठ्या प्रमाणावर दृष्य प्रकाशाचे उत्सर्जन होते. पण, दोन कृष्णविवरांचे विलीनीकरण होताना दृष्यप्रकाशाची नोंद होत नाही. 
- जीडब्ल्यू190814 नावाने ओळखल्या जाणाऱ्या या घटनेमुळे हबल स्थिरांकाची मोजणी नव्याने झाली. 

चीनच्या ५२ ॲप्सपासून सावध राहा, वाचा पूर्ण यादी

- हबल स्थिरांक विश्वाच्या विस्ताराचा किंवा प्रसारण्याच दर सांगतो. सध्या तो 75 किलोमीटर प्रतिसेकंद प्रति मेगापार्सेक एवढा आहे. (एक मेगापार्सेक ः 32 लाख 61 हजार 563 प्रकाशवर्षे) 
- पुढील संशोधनात लायगो इंडियाची महत्त्वपूर्ण भूमिका असेल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Albert Einstein Theory of relativity test again gravitational waves