esakal | Airtel alert! ५.५ कोटी ग्राहकांना मोफत रिचार्ज
sakal

बोलून बातमी शोधा

bharti airtel

Airtel alert! ५.५ कोटी ग्राहकांना मोफत रिचार्ज

sakal_logo
By
नामदेव कुंभार

भारतामधील प्रमुख दूरसंचार कंपनी एअरटेलनं (Airtel) कोरोना काळात आपल्या ग्राहकांना एकापेक्षा एक स्वस्त प्लॅन आणि स्पेशल ऑफर देत आहे. एअरटेल कंपनीने नुकतेच अल्‍प-उत्‍पन्‍न गटातील ग्राहकांसाठी कोरोना महामारीत आपल्या नेटवर्कशी जोडले राहावे यासाठी एक स्पेशल प्लॅन आणला आहे.

कोरोना काळात कंपनीकडून ग्राहकांसाठी एक-वेळचे गेस्‍चर म्‍हणून अल्‍प उत्‍पन्‍न गटातील ५.५ कोटी ग्राहकांना ४९ रूपयांचा मोफत रिचार्ज देण्यात येणार आहे. या पॅकमध्‍ये ३८ रूपयांचा टॉकटाइम आणि १०० एमबी डेटाचा समावेश आहे. हा स्पेशल रिचार्जची वैधता २८ दिवसांपर्यंत आहे. पुढील आठवड्यापासून ग्राहकांना या सुविधेचा लाभ मिळणार आहे. आपल्या या योजनाद्वारे कंपनी आपल्या ५.५ कोटीहून जास्त ग्राहकांना मजबूत बनवणार आहे. यात जास्तीत जास्त ग्राहक हे ग्रामीण भागातील आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं भारतात हाहा:कार माजवलाय. कोरोना संकटामध्ये भारताच्या मदतीसाठी सर्वजण धावून आले आहेत. यामध्ये टेक क्षेत्रातूनही मदत येत आहे. देशातील आघाडीची टेलिकॉम कंपनी ऐअरटेलनेही आपल्या ग्राहाकांना खास मदत केली आहे.