सॅमसंगचं नवं फीचर; इतरांच्या हातात तुमचा मोबाइल दिलात तरी खाजगी डेटा सुरक्षित राहणार

Alt Z Life Privacy Features of Galaxy A51 and A71
Alt Z Life Privacy Features of Galaxy A51 and A71

Gen Z च्या युजर्ससह लाखो लोक त्यांच्या स्मार्टफोनचा वापर फोटो काढण्यासाठी, गेम्स खेळण्यासह कुटुंबिय आणि मित्रांच्या संपर्कात राहण्यासाठी तसंच इंटरनेटवर माहिती शोधण्यासाठी करतात. फोन जेव्हा तुमच्याजवळ असतो तेव्हा त्याबाबत तुम्हाला नेहमीच सुरक्षितता वाटत असते. तुमच्याकडे जेव्हा तुमचे मित्र, नातेवाइक किंवा लहान मुलं फोन मागतात तेव्हा त्यांना नकार देऊ शकता का? त्यात विशेषत: कॅमेरा वापरण्यासाठी फोन घेतला जातो. पण तो वापरत असताना तुमचा खाजगी डेटा उघडला जाण्याची शक्यता असते.

तुमचा खाजगी डेटा खाजगीच रहावा यासाठी तुम्हाला Alt Z Life मदत करेल. सॅमसंगने पहिलं प्रायव्हसी फीचर लाँच केलं असून त्याचं नाव क्विक स्विच असं आहे. यामुळे जेव्हा तुमचा फोन इतर कोणाकडे देता तेव्हा वाटणारी असुरक्षिततेची भावना कमी करण्यास मदत होईल. पॉवर की दोन वेळा दाबताच फीचर काम करेल. क्विक स्विच आणि तुमचा कोणता कंटेंट सुरक्षित ठेवायचा आहे. यासॅमसंगच्या ‘मेक फॉर इंडिया’ अंतर्गत क्विक स्विच आणि कंटेंट सजेशन देते. यात खाजगी फोटो आणि इतर डेटा ओळखण्यास मदत होते. हे फीचर Galaxy A71 आणि Galaxy A51 या दोन मॉडेलमध्ये उपलब्ध असेल. 

तुम्हालाही कामाच्या ठिकाणी डेस्कवर स्मार्टफोन ठेवून जाण्याची सवय आहे का? तसंच फोनवरील आर्टीकल किंवा डॉक्युमेंट वाचण्यासाठी तुमचा फोन इतरांकडे देता का? तुमचा खाजगी डेटा कोणी बघेल अशी भीती वाटत असेल तर घाबरू नका Quick Switch तुमचा डेटा सुरक्षित ठेवेल.

Quick Switck हे एक आल्ट झेड लाइफसाठी आवश्यक सर्व बाबी पूर्ण करतं. हे सहज आणि सोयीचं आहे. जेव्हा तुम्ही तुमचा स्मार्टफोन दुसऱ्या कोणाकडे देता तेव्हा फक्त पॉवर की दोन वेळा दाबून अॅक्टिव्ह करता येतं.

क्विक स्विचचा वापर फक्त गॅलरीतील डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी होतो असा नाही तर वेब ब्राउजर, व्हॉटसअॅपसह इतर अॅप्सचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठीही करता येतो. तुम्ही क्विक स्विच केलेलं कोणाला कळणार सुद्धा नाही इतकं सहज ते होतं.

जेव्हा कोणी तुमची गॅलरी बघणार असतं तेव्हा त्यांना पब्लिक व्हर्जन दाखवू शकता. त्यावेळी Secure Folder मधील माहिती त्यांना पाहता येणार नाही. ती फक्त तुम्हालाच पाहता येईल. तुम्ही सेटिंग करून जे फोटो आणि इतर माहिती इतरांपासून सुरक्षित ठेवली आहे ती Secure Folder मध्ये राहते. हा फोल्डर सॅमसंग क्नॉक्सने तयार केला आहे.

कंटेंट सजेशन हे ‘On-Device AI’ फीचरमधून येतं. Secure Folder मध्ये Content Suggestions वापरून महत्वाचा आणि खाजगी डेटा त्या फोल्डरमध्ये मूव्ह केला जातो. युजर ही माहिती कोणाला दाखवायची हे ठरवू शकतो. त्यात फेस, इमेजेस आणि टॅग वापरू शकतो. कंटेंट सजेशनमधून मूव्ह केलेले फोटो आणि डेटा इतरांना पाहता येणार नाही. ही सर्व प्रोसेस डिव्हाइसवरच होते. यामध्ये क्लाउड किंवा बाहेरच्या सर्व्हरचा वापर होत नाही. सॅमसंगने पहिल्यांदाच हे फीचर्स दिले असून ग्राहकांना त्यांचे खाजगीपण जपता येईल.

Galaxy A51 आणि Galaxy A71 ही डिव्हाइसेस सॅमसंग क्नॉक्सने सुरक्षित आहे. यामध्ये मल्टिलेअर डिफेन्स ग्रेड सिक्युरीटी प्लॅटफॉर्म असून  One UI सॉफ्टवरेअवर तयार केलं आहे. Google च्या Android OS वर ते आधारीत आहे. ही एक प्रायव्हसी सिस्टीम encrypts असून युजरचा डेटा सुरक्षित ठेवतो. इतर स्मार्टफोन कंपन्यांनी अद्याप अशी सुविधा दिलेली नाही. सॅमसंग सुरक्षेबाबत असं पाऊल उचलणारी पहिलीच कंपनी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com