Amazfit Smartwatch: १५० स्पोर्ट्स मोड, कॉलिंग सपोर्टसह आली भन्नाट स्मार्टवॉच; जाणून घ्या किंमत

Amazfit ने भारतीय बाजारात आपली नवीन स्मार्टवॉच लाँच केली आहे. या वॉचमध्ये अनेक शानदार फीचर्स मिळतात.
Amazfit Smartwatch
Amazfit SmartwatchSakal

Amazfit New Smartwatch Launched: लोकप्रिय फिटनेस ब्रँड Amazfit ने बाजारात आपल्या नवीन स्मार्टवॉचला लाँच केले आहे. कंपनीने भारतात आपली सर्वात महागडी आणि शानदार स्मार्टवॉच लाँच केली आहे. Amazfit Falcon मध्ये कंपनीने एकापेक्षा एक शानदार फीचर्स दिले आहेत. या वॉचमध्ये इन-बिल्ट जीपीएससह सहा सेटेलाइट पोजिशनिंग सिस्टम दिली आहे.

हेही वाचा: भारतीय उत्पादनांच्या खरेदीतली वाढ बनवेल देशाला आर्थिक महासत्ता...

Amazfit Falcon चे फीचर्स

Amazfit Falcon वॉच एअरक्राफ्ट-ग्रेड टीसी४ टायटेनियम यूनिबॉडीने बनलेली आहे. यात क्रिस्टल ग्लास स्क्रीन दिली आहे. याशिवाय, १५० पेक्षा अधिक बिल्ट-इन स्पोर्ट्स मोड दिले असून, यात हाय-स्पीड वॉट स्पोर्ट्स जसे की काइट सर्फिंगपासून ते गोल्फ स्विंग मोडचा समावेश आहे.

कंपनीचा दावा आहे की, यूजरची अ‍ॅक्टिव्हिटी ट्रॅक करण्यासाठी स्पोर्ट्स मोड डेटा ऑन-स्क्रीन राहील. तुम्ही वॉचवर गाणी देखील स्टोर करू शकता व ब्लूटूथ इयरफोन्सच्या माध्यमातून ऐकता येईल. Amazfit Falcon मध्ये एआयवर आधारित Zepp कोच फीचर देखील आहे. याद्वारे तुम्हाला व्यायामासाठी मार्गदर्शन केले जाईल. फिट राहण्यासाठी हे फीचर खूपच उपयोगी येईल.

Amazfit Smartwatch
Voter ID: मतदान ओळखपत्र हरवले आहे? घाबरू नका, 'ही' प्रोसेस फॉलो करून घरबसल्या करा डाउनलोड

Amazfit Falcon ची किंमत

Amazfit Falcon ला भारतीय बाजारात तब्बल ४४,९९९ रुपये किंमतीत लाँच करण्यात आले आहे. ग्राहक ३ डिसेंबर २०२२ पासून कंपनीच्या वेबसाइटवरून या वॉचला खरेदी करू शकतात. याशिवाय, Amazfit Falco वॉचला देखील प्री-ऑर्डर करता येईल.

Amazfit Pop 2 स्मार्टवॉच देखील लाँच

Amazfit ने भारतात Pop 2 स्मार्टवॉचला देखील लाँच केले आहे. या वॉचद्वारे Noise, Fire-Bolt सारख्या कंपन्यांना टक्कर देण्याचा Amazfit चा प्रयत्न आहे. Amazfit Pop 2 स्मार्टवॉचमध्ये ब्लूटूथ कॉलिंग, एक मोठा इमर्सिव्ह डिस्प्ले आणि सिंगल चार्जमध्ये आठवडाभर चालणारी दमदार बॅटरी दिली आहे. ही वॉच ब्लूटूथ कॉॉलिंग फीचर सपोर्टसह येते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com