Vivo ची थक्क करणारी ऑफर, फक्त दोन हजारात फोन घरी घेऊन जा!

Vivo ने काही महिन्यांपूर्वी Vivo T2 सीरीज लाँच केली होती
Vivo Amazing Offer
Vivo Amazing Offer esakal

Vivo Amazing Offer : Vivo ने काही महिन्यांपूर्वी Vivo T2 सीरीज लाँच केली होती. यात Vivo T2 आणि Vivo T2x 5G हे स्मार्ट फोन चर्चेत आहेत.Vivo T2x 5G स्मार्टफोन फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध आहे. पण हा फोन 2000 रुपये सुरुवातीला भरून कसा विकत घ्यायचा, हे जाणून घेऊ!

सुप्रसिद्ध चीनी स्मार्टफोन कंपनी Vivo ने यावर्षी एप्रिलमध्ये आपल्या बजेट स्मार्टफोन Vivo T2 सीरिज लाँच केली. आता कंपनी या सीरिजमधील Vivo T2x 5G विक्रीसाठी बाजारात आणत आहे. महत्त्वाचं म्हणजे हा फोन तुम्ही फक्त 2000 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत खरेदी करू शकता. या डिवाइसमध्ये तुम्हाला 50MP प्राइमरी कॅमेरा आणि 5000mAh ची बॅटरी मिळत आहे. याशिवाय फोनमध्ये अनेक खास फीचर्स आहेत.

Vivo Amazing Offer
Health Care News: तुम्हालाही ऑस्टिओपोरोसिसची समस्या आहे का? या गोष्टी खाल्ल्याने मिळतो आराम

Vivo T2x 5G किंमत

Vivo T2x 5G भारतात तीन प्रकारांमध्ये हा फोन लॉन्च करण्यात आला. त्याच्या 4GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 12,999 रुपये, 6GB RAM + 128GB व्हेरिएंटची किंमत 13,999 रुपये आणि 8GB RAM + 128GB व्हेरिएंटची किंमत 15,999 रुपये आहे.4 GB RAM असलेलं मॉडेल Flipkart वर 11,999 रुपयांमध्ये मिळेल. म्हणजेच तुम्हाला 1000 रुपयांची सूट मिळत आहे.

Vivo Amazing Offer
Foods for Liver Health : हळद, कॉफीसह ‘या’ २ गोष्टींचा आहारात करा समावेश; यकृत राहील निरोगी

जर तुम्हाला हा फोन 2000 रुपयांना विकत घ्यायचा असेल, तर EMI पर्याय निवडावा लागेल. यामुळे तुम्ही सर्वात कमी किमतीत फोन विकत घेऊ शकता. याशिवाय, बँक ऑफर अंतर्गत या मॉडेल वर 1000 रुपयांची सूट उपलब्ध आहे. यामुळे त्याची किंमत 10,999 रुपये होईल. हा फोन मरीन ब्लू, अरोरा गोल्ड आणि ग्लिमर ब्लॅक कलर व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे.

Vivo Amazing Offer
Health Tips : तुम्हीही कामाच्या नादात ८ तासांपेक्षा जास्त वेळ एकाच जागी बसून राहता काय? जाणून घ्या तोटे

Vivo T2x 5G चे फीचर्स

Vivo T2 5G मध्ये 6.38-इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे. यामध्ये 90Hz रिफ्रेश रेट आणि FHD+ रिझोल्यूशन आहे.महत्वाचं म्हणजे स्नॅपड्रॅगन 695 चीपसेट असलेला प्रोसेसर असून 8GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेज उपलब्ध आहे.या फोनमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. यात ड्युअल रियर कॅमेरा सेटअप असून 64MP सेन्सर आणि 2MP लेन्स आहे. यात सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 16MP फ्रंट-फेसिंग कॅमेरा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com