

Amazon Plans $7 Billion Investment in India by 2030, Announces Four New Renewable Energy Projects
esakal
अमेरिकेतील ई-कॉमर्स आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी ॲमेझॉनने भारतातील अक्षय ऊर्जा क्षेत्रात मोठी गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. कंपनी 2030 पर्यंत भारतातील सौर आणि पवन ऊर्जा प्रकल्पांमध्ये अतिरिक्त 7 अब्ज डॉलर (सुमारे 65,393 कोटी रुपये) गुंतवणार आहे. यापूर्वी कंपनीने भारतातील अक्षय ऊर्जा प्रकल्पांसाठी 4 अब्ज डॉलरची गुंतवणूक करारबद्ध केली आहे. वाढत्या वीज गरजा पूर्ण करणे आणि कार्बन उत्सर्जन कमी करणे हा या गुंतवणुकीमागील उद्देश आहे.