Amazon sale : स्मार्टफोन्सवर मिळतोय बंपर डिस्काउंट, पाहा डिटेल्स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

amazon great freedom festival sale starts from 6 august know the details here

Amazon sale : स्मार्टफोन्सवर मिळतोय बंपर डिस्काउंट, पाहा डिटेल्स

Amazon Great Freedom Festival sale : नवीन स्मार्टफोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर Amazon स्वातंत्र्य दिनापूर्वी (15 ऑगस्ट) भारतात ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल सेलचे आयोजन करत आहे. हा सेल इव्हेंट 6 ऑगस्टपासून सुरू होईल आणि 10 ऑगस्ट पर्यंत सुरू राहणार आहे. या सेलमध्ये कोणत्या स्मार्टफोन ब्रँडवर सूट दिली जात आहे ते आज आपण पाहणार आहोत..

स्मार्टफोनवर 40% सूट

द ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हलमध्ये इलेक्ट्रॉनिक्स, किचनवेअर आणि ब्युटी प्रॉडक्ट्सवर सवलत मिळणार आहे. अॅमेझॉनच्या मायक्रोसाइटवर माहिती देण्यात आली आहे की ते स्मार्टफोनवर 40 टक्के सूट देत आहे.

यासोबतच नो-कॉस्ट ईएमआय, एक्सचेंज ऑफर आणि फ्री स्क्रीन रिप्लेसमेंट सारख्या ऑफर देखील उपलब्ध असतील. याव्यतिरिक्त, SBI क्रेडिट कार्ड असलेल्या ग्राहकांना निवडक फोनवर 2,000 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. महत्वाची गोष्ट म्हणजे Amazon सेल इव्हेंट दरम्यान, फोन आणि इतर उत्पादनांच्या किमतींमध्ये चढ-उतार होत राहतात. Amazon ने ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल सेलच्या सेल ऑफरमध्ये येणाऱ्या सर्व स्मार्टफोन्स लीस्ट करण्यात आले आहेत.

कंपनीने एक डेडिकेटेड वेबसाइट तयार केली आहे जी iPhone 13, iQoo 9 5G सारख्या प्रीमियम स्मार्टफोन्स डिस्प्ले करण्यात आले आहेत. या व्यतिरिक्त, तुम्हाला साइटवर Galaxy A73 5G च्या किंमतीत करण्यात आलेली कपात देखील दाखवली जाईल. येथे ग्राहक Redmi Note 11, iQoo Z6 सह 20,000 रुपयांच्या खाली फोन देखील पाहू शकतात.

प्रीमियम स्मार्टफोन्सवर देखील सूट

या सेलमध्ये iPhone 13 वर डिस्काउंट असेल, या फोनची रिटेल किंमत 70,900 रुपये आहे. त्याच वेळी, iQOO 9 आणि iQOO 9 Pro वर देखील सूट दिली जाईल. या स्मार्टफोनची किंमत अनुक्रमे 42,990 रुपये आणि 64,990 रुपये आहे. Samsung Galaxy A73 बद्दल बोलायचे झाले तर तुम्ही हा प्रीमीअम स्मार्टफोन 48,990 रुपयांऐवजी 41,999 रुपयांना खरेदी करू शकता.

30 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीचे स्मार्टफोन

Samsung Galaxy A33 5G हा 32,990 रुपयांऐवजी फक्त 25,499 रुपयांमध्ये उपलब्ध होईल. त्याच वेळी, तुम्ही OPPO F21 Pro हा स्मार्टफोन 21,749 रुपयांना आणि iQOO Neo 6 5G हा 25,999 रुपयांना खरेदी करू शकता.

20 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीचे स्मार्टफोन

या सेलमध्ये तुम्ही Realme Narzo 50 हा स्मार्टफोन 12,999 रुपयांना, Xiaomi 11 Lite NE 5G हा फोन 18,499 रुपयांना आणि iQOO Z6 5G हा स्मार्टफोन 12,999 रुपयांना खरेदी करू शकता

टॅग्स :Amazon