
अमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल 2025 मध्ये 80% पर्यंत सूट मिळेल.
SBI बँक कार्डवर 10% सूट आणि नो-कॉस्ट EMI उपलब्ध आहे.
प्राइम सदस्यांना सेलमध्ये 24 तास आधी प्रवेश मिळेल.
Amazon Sale : अमेझॉनने यंदाच्या ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल 2025 ची घोषणा करत देशभरातील ग्राहकांमध्ये उत्साह निर्माण केला आहे. दिवाळी आणि धनत्रयोदशीच्या खरेदीसाठी ही मेगा सेल उत्तम संधी ठरणार आहे. कंपनीने आपल्या अधिकृत वेबसाइटवर मायक्रोसाईट लाँच केली असून यातून सेलच्या आकर्षक ऑफर्सची माहिती समोर येत आहे.