Amazon Great Indian Festival sale | या ५ उपकरणांवर ५० टक्के सूट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Amazon Great Indian Festival

Amazon Great Indian Festival sale : या ५ उपकरणांवर ५० टक्के सूट

मुंबई : Amazon चा ग्रेट इंडियन फेस्टिव्हल 2022 सेल सुरू झाला आहे. हा सेल 23 सप्टेंबर ते 30 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. स्मार्टफोन, लॅपटॉप आणि टीव्हीसोबतच सेलमध्ये गेमिंग उत्पादने, ऑडिओ, म्युझिक सिस्टिमवरही उत्तम ऑफर्स पाहायला मिळत आहेत.

तुम्ही परवडणाऱ्या किंमतीत इलेक्ट्रॉनिक्स उत्पादने खरेदी करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. यात आपण 50% पेक्षा जास्त सूट असलेल्या पाच सर्वोत्तम उत्पादनांबद्दल जाणून घेणार आहोत.

हेही वाचा: Smartphone : एका चार्जमध्ये ७ दिवस चालेल हा waterproof smartphone

Alexa सह इको डॉट (3th Gen) स्मार्ट स्पीकर

Amazon सेलमध्ये, Echo Dot 2,950 रुपयांच्या डिस्काउंटसह 1,549 रुपयांना खरेदी करता येईल. हा स्पीकर बाकी स्पीकरपेक्षा थोडा वेगळा आहे. तुम्ही या स्पीकरशी बोलू शकता. त्याला हिंदीही चांगले कळते. हँड्स फ्री म्युझिक कंट्रोल ऑप्शन आणि कंट्रोल स्मार्ट होम सारखे फीचर्स या स्पीकरमध्ये देण्यात आले आहेत.

हेही वाचा: Flipkart Sale : Nothing Phone 1 आणि Google Pixel 6aवर ५ हजारांची सूट

इको शो 5 (2nd generation)

Amazon Echo Show 5 फक्त 3,999 रुपयांना खरेदी करता येईल. त्याची किंमत 8,999 रुपये आहे, म्हणजेच या उत्पादनावर 5,000 रुपयांची सूट मिळत आहे. Amazon Echo Show 5 मध्ये स्पीकरसह 5.5-इंचाचा डिस्प्ले आहे.

हे व्हॉईस कमांडद्वारे देखील नियंत्रित केले जाऊ शकते. यात उत्तम व्हिडिओ कॉलिंग आणि कॅमेरा आहे. कॅमेऱ्यासोबत प्रायव्हसीसाठी कॅमेरा शटरही आहे.

इको बड्स (2nd generation)

Echo Buds 2 देखील Amazon Sale मध्ये अतिशय कमी किंमतीत खरेदी करता येईल. त्याची किंमत 11,999 रुपये आहे, परंतु सेलमध्ये 6,500 रुपयांच्या डिस्काउंटनंतर 5,499 रुपयांना खरेदी करता येईल.

इको बड्स 2 अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्हींसोबत जोडले जाऊ शकते. बड्स इन-बिल्ट अलेक्सा आणि 5 तासांच्या प्लेबॅक वेळेसह येतात.

इको फ्लेक्स-प्लग-इन

Amazon Echo Flex Plug-in हे एक उत्तम स्मार्ट होम डिव्हाइस आहे. हे 1,499 रुपयांमध्ये 1,500 रुपयांच्या फ्लॅट डिस्काउंटसह खरेदी केले जाऊ शकते. इको फ्लेक्स प्लग-इन व्हॉइस कमांडसह अंगभूत अलेक्साला देखील समर्थन देते. त्याच्या मदतीने, तुम्ही इतर स्मार्ट होम डिव्हाइसेस देखील नियंत्रित करू शकता.

फायर टीव्ही स्टिक 4K

Amazon चा Fire TV Stick 4K देखील अर्ध्या किंमतीत खरेदी करता येईल. सेलमध्ये त्याची किंमत 2,999 रुपये आहे. ही टीव्ही स्टिक खूप वेगाने काम करते, यात वेगवान वाय-फायसाठी सपोर्ट आहे. फायर टीव्ही स्टिक 4K UHD, HDR सह HDR10+ स्ट्रीमिंग ऑफर करते.

ही फायर स्टिक डॉल्बी व्हिजन आणि डॉल्बी अॅटमॉसला देखील सपोर्ट करते. Amazon Prime Video आणि Netflix सारख्या अॅप्सचा आनंद टीव्ही स्टिकमध्ये डॉल्बी व्हिजन आणि 4K रिझोल्यूशनसह घेता येतो.

Web Title: Amazon Great Indian Festival Sale 50 Percent Off On These 5 Devices

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Alexaamazon india