

Amazon Great Indian Festival Sale: Top 5 Smartphone Deals & Offers
esakal
Amazon Festival Sale 2026: फेस्टिव्ह सीजनच्या पार्श्वभूमीवर बहुप्रतिक्षित 'अमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल' (Amazon Great Indian Festival Sale) आजपासून (8 ऑक्टोबर) सुरू झाला आहे. नवीन स्मार्टफोन खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी हा सेल एक मोठी संधी ठरत आहे. या सेलमध्ये ॲपल (Apple), सॅमसंग (Samsung), वनप्लस (OnePlus), रेडमी (Redmi) आणि लावा (Lava) यांसारख्या प्रमुख ब्रँड्सच्या लोकप्रिय स्मार्टफोन्सवर भरघोस डिस्काउंट दिला जात आहे.
थेट किमतीतील डिस्काउंटशिवाय ग्राहकांना स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) क्रेडिट कार्डवर इन्स्टंट डिस्काउंट, नो-कॉस्ट ईएमआय (No-Cost EMI) आणि जुन्या फोनवर मोठी एक्सचेंज व्हॅल्यू (Exchange Bonus) देखील मिळत आहे. या सेल मधील टॉप 5 बेस्ट स्मार्टफोन डील्सची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे-