Amazon New Feature : स्वदेशी बनो! आता मराठीतही करता येणार शॉपिंग; कसे ते वाचा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Amazon New Technology

Amazon New Feature : स्वदेशी बनो! आता मराठीतही करता येणार शॉपिंग; कसे ते वाचा

Amazon New Technology : अ‍ॅमेझॉन ही एक लोकप्रिय ई-कॉमर्स वेबसाइट आहे. या ई-कॉमर्स वेबसाइटवरून, लोक घरी बसून दररोज किती उत्पादने ऑनलाइन खरेदी करतात हे माहित नाही. भारतासोबतच जगातील अनेक देशांमध्ये अ‍ॅमेझॉनची सुविधा उपलब्ध आहे.

हेही वाचा: Technology : Amazon Sale मध्ये Redmi 10A Sport झाला खूपच स्वस्त, नवीन किंमत वाचून व्हाल थक्क

या वेबसाइटवर आपल्या युजर्सला फक्त भाषा या कारणाने कोणत्याही त्रासाला सामोरे जायला नको म्हणून आता या कंपनीने नवीन फिचर्स लॉन्च केले आहेत. तुम्ही सेटिंग मध्ये जाऊन आपल्या भाषेत अ‍ॅमेझॉन साईट वरून शॉपिंग करू शकतात.

हेही वाचा: Technology : कपडे धुण्याचं टेन्शनंच संपलं; बादलीच करणार Washing Machine चं काम

अ‍ॅमेझॉनने आपल्या प्लॅटफॉर्मवर अनेक देशांच्या भाषा यात अॅड केल्या आहे. त्यात भारतातील सर्वाधिक बोलल्या जाणार्‍या 'हिंदी' भाषेसोबत इतरही भाषेंचाही समावेश आहे.आजच्या काळात सर्वच वर्गातील लोक अ‍ॅमेझॉन वरून खरेदी करत आहेत.

हेही वाचा: Technology Tips : लॅपटॉपचा वेग मंदावलाय ? हा उपाय केल्यास विनाअडथळा होईल काम

भारतातही अनेक वापरकर्ते आहेत ज्यांना इंग्रजी वाचण्यात आणि लिहिण्यात अडचण येते. अशा वापरकर्त्यांसाठी, अ‍ॅमेझॉन वेबसाइटवर अनेक प्रादेशिक भाषा आहेत. त्यामुळे आता तुम्ही तुमच्या पसंतीची भाषा वापरून, अ‍ॅमेझॉन वरून खरेदी करू शकतात.

हेही वाचा: Technology: तुम्हाला सर्वोत्तम OPPO स्मार्टफोन मिळू शकतो आणि तोही फक्त ₹९९९० मध्ये

अ‍ॅमेझॉन वेबसाइटवर तुमची भाषा अशा प्रकारे बदला

तुम्हालाही अ‍ॅमेझॉनवर इंग्रजीऐवजी हिंदी किंवा इतर कोणत्याही भाषेत खरेदी करायची असेल, तर खालच्या स्टेप्स फॉलो करा.

१. सर्व प्रथम अ‍ॅमेझॉन वेबसाइट उघडा.

२. आता लॉगिन करा आणि खालच्या बाजूला असलेल्या तीन लाइन्स असलेल्या Menu वर क्लिक करा.

३. आता ओपन झालेल्या स्लाईडला स्क्रोल करत सर्वात शेवटी Settings वर क्लिक करा.

हेही वाचा: Technology: 5G लाँचच्या आधीच 6G ची तयारी सुरू! स्वदेशी असणार 6G टेक्नॉलॉजी

४. Settings मध्ये Country & Language ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करा.

५. आपल्या हव्या असलेली भाषा निवडा आणि मग save वर क्लिक करा.

तुम्हाला वेबसाईट वर तुमची भाषा दिसेल

टीप

अ‍ॅमेझॉन तुम्हाला हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम, बंगाली आणि मराठी भाषांसाठी सपोर्ट मिळतो.