Technology: 5G लाँचच्या आधीच 6G ची तयारी सुरू! स्वदेशी असणार 6G टेक्नॉलॉजी

5G नेटवर्कच्या लाँचिंग पार्शभूमीवरच 6G सर्विसेस डेवलप करण्यास सुरूवात झाली आहे.
Technology: 6G developement is also in under process
Technology: 6G developement is also in under processesakal

5G नेटवर्क लवकरच भारतात रोलआऊट होणार आहे. जीओ, एअरटेल, व्हिआय या तिन्ही कंपनीज आता 5G च्या तयारीत व्यस्त आहेत. टेलीकॉम मंत्र्यांच्या मते ऑक्टोबरपर्यंत भारतात 5G सर्विस उपलब्ध होणार आहे. राज्यमंत्री देवुसिंह चौहान यांनी याबाबतची माहिती दिली आहे. मात्र आता 5G नेटवर्कच्या लाँचिंग पार्शभूमीवरच 6G सर्विसेस डेवलप करण्यास सुरूवात झाली असल्याचे कळते आहे. (Technology: 6G developement is also in under process)

इंटरनॅशनल टेलीकम्यूनिकेशन यूनियन रिजनल स्टैंडर्डायजेशन फर्मच्या (ITURSF) एका उद्घाटन समारोहात पोहोचले असाताना त्यांनी या वर्षाच्या शेवटपर्यंत 5G सर्विस सुरू होणार असल्याचे सांगितले.

6G च्या तयारीलाही सुरूवात

जवळपास एका महिन्यात 5G मोबाईल सर्विसेस देशात रोलआऊट होणार ज्यामुळे प्रत्येक क्षेत्रातील विकास वाढणार आहे. 6G टेक्नॉलॉजी इनोवेशन ग्रुपने देखील सेटअप केलाय, जो 6G डेवलप करण्याचं काम करेल. शासन स्वदेशी डिझाईन, डेवलपमेंट आणि मॅन्युफॅक्चरींगला प्रोत्साहन देत आहे. तसेच देशात संपूर्णत: 5G टेस्ट बेड विकसित केला आहे. ज्यामुळे 5G एलिमेंटच्या टेस्टिंगला मदत होईल.

Technology: 6G developement is also in under process
MPSC Mobile App: उमेदवारांसाठी आयोगाने सुरू केलं मोबाईल अॅप

लवकरच सुरू होणार 5G रोलआऊट

यावर्षी वर्षाच्या शेवटपर्यंत देशात विकसित आणि मॅन्युफॅक्चर झालेले 5G स्टॅक्स बघायला मिळू शकतं. अलीकडेच 5G स्पेक्ट्रमच्या निलामीची प्रक्रिया सुरू झाली आहे. दूरसंचार विभागाच्या मते 4G च्या तुलनेत 5G सर्विसेसची स्पिड १० पटीने जास्त असणार आहे. यामध्ये कटेंट लवकर डाऊनलोड होणार. तसेच कॉलिटी पण चांगली असणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com