लवकरच येणार 'ऍमेझॉन गो स्टोअर'

वृत्तसंस्था
मंगळवार, 6 डिसेंबर 2016

वॉशिंगट - मोठ्या स्टोअर्समध्ये किराणा सामान खरेदी केल्यानंतर त्याचे बिल भरण्यासाठी लांब रांगेमध्ये उभे राहावे लागते. यावर उपाय म्हणून, 'ऍमेझॉन गो स्टोअर'ची घोषणा करण्यात आली आहे. वॉशिंगटमधील सिअॅटन शहरात 'ऍमेझॉन गो स्टोअर' ग्राहकांसाठी लवकरच उपलब्ध होणार आहे.  

या स्टोअरमध्ये तुम्ही खरेदी केलेल्या सामानाचे बिल आपोआप 'ऍमेझॉन गो स्टोअर'च्या ऍपद्वारे भरणे शक्य होणार आहे. त्यामुळे आता ग्राहकांचा रांगेत उभे राहण्याचा त्रास वाचणार आहे. 

'ऍमेझॉन गो स्टोअर'मध्ये खरेदी करताना...
- 'ऍमेझॉन गो स्टोअर'मध्ये प्रवेश करण्यासाठी तुम्हाला ऍप ओपन करुन ते स्कॅन करावे लागेल. 
- स्टोअरमध्ये प्रवेश मिळाला की तुम्ही हवे ते सामान खरेदी करु शकता. 
- खरेदी झाल्यानंतर बिल भरण्यासाठी कुठल्याही प्रराकच्या रांगेत उभे राहण्याची गरज नाही. 
- स्टोअरच्या बाहेर आल्यानंतर तुम्ही जे काही खरेदी केले आहे, त्याची माहिती वर्च्युअल कार्टमध्ये आपोआप अपडेट होईल. 
- खरेदी केलेली एखादी गोष्ट तुम्हाला नको असल्यास आणि ती पुन्हा ठेवल्यास, त्याची नोंदही कार्टमधून काढली जाईल.   
- स्टोअरमधून बाहेर पडल्यावर ऍमेझॉनच्या 'जस्ट वॉक आऊट' टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून खरेदीबाबतचा खर्च, त्याची पावती अशी सर्व माहिती वर्च्युअल कार्टवर पाठवण्यात येईल.  

गेल्या काही वर्षांच्या तुलनेत या स्टोअरद्वारे ग्राहकांना ऍडव्हान्स्ड टेक्नॉलॉजीचा लाभ घेता येणार आहे. याबाबतचा एक व्हिडिओ ऍमेझॉनने नुकताच शेअर केला आहे. 

व्हिडिओ सौजन्य -  amazon youtube

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Amazon planning smart app-based 'Go' stores in U.S. next year

व्हिडीओ गॅलरी