Amazon Prime Day Sale: आला रे आला अमेझॉनचा ‘प्राइम डे सेल’ आला; मध्यरात्रीच सुरू होतोय धडका, मोठी संधी चुकवू नका!

Amazon Prime Day Sale Offers: जाणून घ्या, काय काय मिळणार आहे प्रचंड स्वस्त अन् निम्म्या किंमतीत कोणत्या वस्तू खरेदी करण्याची आहे संधी?
Amazon Prime Day Sale Amazon Prime Day Sale Massive deals from 12–14 July on top brands in electronics, fashion, home appliances, and more.
Amazon Prime Day Sale Massive deals from 12–14 July on top brands in electronics, fashion, home appliances, and more. esakal
Updated on

Amazon Prime Day sale 2025 schedule : अमेझॉनने आपल्या ग्राहकांसाठी एक मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. आपल्या प्राइम डे सेलच्या सुरुवातीच्या डील अमेझॉनकडून सुरू करण्यात आल्या आहेत. तर, १२ जुलै ते १४ जुलै दरम्यान चालणाऱ्या या सेलमध्ये स्मार्टफोन, स्मार्ट टीव्ही, एसी, फ्रिज, लॅपटॉप, टॅब्लेटसह अनेक इलेक्ट्रॉनिक्स वस्तू अर्ध्या किमतीत उपलब्ध असणार आहेत. त्यामुळे आता ग्राहकांच्या अक्षरशा खरेदीसाठी उड्या पडणार असल्याचे दिसत आहे.

 अमेझॉनने या सेलमध्ये उपलब्ध असलेल्या ऑफर्सचा खुलासा केला आहे. ग्राहकांना यामध्ये वनप्लस, सॅमसंग, आयक्यूओ, अ‍ॅपल सारख्या ब्रँडचे अलीकडेच लाँच झालेले फोन स्वस्तात खरेदी करता येणार आहेत. तसेच या सेलमध्ये उपलब्ध असलेल्या बाकी काही ऑफर्सबद्दलही आपण जाणून घेऊया.

अमेझॉनचा हा ‘प्राइम डे सेल’ सेल मध्यरात्री १२ वाजता सुरू होणार आहे. या तीन दिवसांच्या सेलमध्ये,  या वर्षी आणि गेल्या वर्षी लाँच झालेल्या फोनच्या खरेदीवर हजारो रुपये वाचवता येणार आहेत. ज्यात OnePlus 13s, OnePlus 13, OnePlus 13R, OnePlus Nord 5, OnePlus Nord 5 CE, Galaxy S24 Ultra, iQOO 13, iQOO Z10, iQOO Z10 Lite, Redmi Note 14, Redmi Note 14 Pro Samsung Galaxy M36, Samsung Galaxy S24, Galaxy S24 Plus आदींचा समावेश असणार आहे.

Amazon Prime Day Sale Amazon Prime Day Sale Massive deals from 12–14 July on top brands in electronics, fashion, home appliances, and more.
Jasprit Bumrah : Video - बुमराहने असाकाही भन्नाट बॉल टाकला, की जगातील तो टॉपचा बॅट्समनही त्याचा ‘बोल्ड’ पाहतच राहिला!

तर Amazon Prime Day Sale मध्ये स्मार्टफोन व्यतिरिक्त, टॅबलेट आणि लॅपटॉप पीसी देखील स्वस्तात घरी आणता येतील. याशिवाय, Lenovo, Dell, HP, Acer सारख्या ब्रँडच्या लॅपटॉपवर चांगली सूट मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Amazon Prime Day Sale Amazon Prime Day Sale Massive deals from 12–14 July on top brands in electronics, fashion, home appliances, and more.
Liquor Shop Viral Video : दारूसाठी तडफड! ; दुकानाच्या खिडकीच्या ग्रिलमध्येच अडकलं दारूड्याचं डोकं अन् मग...

Amazon Prime Day Sale सेलमध्ये फ्रिज, वॉशिंग मशीन इत्यादी चांगल्या सवलतीत घरी आणू शकता, यावर देखील ८० टक्क्यांपर्यंत सूट दिली जाणार आहे. ग्राहकांना Voltas, Bluestar, Samsung, LG, Daikin सारख्या ब्रँडच्या विंडो आणि स्प्लिट AC च्या खरेदीवर चांगल्या ऑफर मिळू शकतात. हे एसी एमआरपीच्या निम्म्या किमतीत मिळू शकतात. मात्र, सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे नावाप्रमाणेच, हा सेल केवळअमेझॉन प्राइम वापरकर्त्यांसाठी असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com