
iPhone, Samsung, OnePlus यांसारख्या ब्रँड्सवर हजारो रुपयांची सूट.
बजेट पासून प्रीमियम स्मार्टफोनपर्यंत सर्वांसाठी भरघोस ऑफर्स.
आज १४ जुलै हा अॅमेझॉन प्राईम डे सेलचा शेवटचा दिवस आहे संधी गमावू नका.
ई-कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज कंपनी Amazon चा बहुप्रतीक्षित Prime Day सेल सध्या जोरात सुरु आहे आणि आज सेलचा शेवटचा दिवस आहे. स्मार्टफोनपासून लॅपटॉप, हेडफोन आणि विविध गॅझेट्सवर बंपर डिस्काउंट देत ही विक्री ग्राहकांसाठी खरेदीची पर्वणी घेऊन आली आहे. विशेष म्हणजे स्मार्टफोनवर मिळणाऱ्या भन्नाट ऑफर्समुळे ग्राहकांचा उत्साह वाढला आहे.
नुकताच भारतात लॉन्च झालेला iPhone 16e, ज्याची मूळ किंमत 59,999 रुपये आहे, तो आता फक्त 49,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. बँक ऑफर्स आणि इन्स्टंट डिस्काउंटमुळे हा iPhone जवळपास 10,000 स्वस्त मिळत आहे. याशिवाय, iPhone 15 वरही मोठी सूट दिली जात असून त्याची किंमत 69,900 रुपयांवरून थेट 57,249 रुपये झाली आहे.
Android स्मार्टफोन प्रेमींसाठी ही विक्री म्हणजे स्वप्नवत संधी आहे. Samsung Galaxy S24 Ultra, जो सामान्यतः 1,29,999 रुपयांना विकला जातो, तो आता फक्त 74,999 रुपयांमध्ये मिळतोय. ही विक्रीतील सर्वात मोठी सवलत मानली जात आहे.
OnePlus च्या स्मार्टफोनवरही दमदार सूट आहे.
OnePlus 13 वर थेट 5000 रुपयांची सूट आणि बँक कार्ड वापरल्यास आणखी 5000 रुपये कमी होतील याची फायनल किंमत फक्त 59,999 रुपये होईल (मूळ किंमत 69,999 रुपये).
OnePlus 13s आता 50000 रुपयांच्या आत मिळतोय.
OnePlus 13R, जो आधीच बजेट फ्लॅगशिप मानला जातो, तो 42,999 रुपयांवरून थेट 39,999 रुपयांमध्ये.
iQOO Neo 10R आता फक्त 23,499 रुपयांमध्ये मिळत आहे.
OnePlus Nord CE 4 Lite 19,999 वरून 15,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे
Realme Narzo 80 Pro, Lava Storm Play, Redmi A4, iQOO Z10x, आणि Samsung Galaxy A55 या बजेट फोनवरही विशेष सूट आहे.
Amazon Prime Day सेल आज, १४ जुलै रोजी संपत आहे. स्मार्टफोन किंवा इतर गॅझेट खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर हीच ती योग्य वेळ आहे. बजेट, मिडरेंज किंवा प्रीमियम श्रेणी प्रत्येकासाठी काही ना काही खास ऑफर उपलब्ध आहे.
1. अॅमेझॉन प्राईम डे सेल कधी संपतो?
➡️ १४ जुलैला हा सेल संपत आहे.
2. iPhone 16e वर किती सूट आहे?
➡️ 59,999 रुपयांच्या iPhone 16e वर 10,000 पर्यंतची सूट मिळत आहे.
3. Samsung Galaxy S24 Ultra कितीला मिळतोय?
➡️ मूळ किंमत 1,29,999 रुपये असलेला हा फोन आता फक्त 74,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.
4. बजेट फोन कोणते स्वस्त झाले आहेत?
➡️ iQOO Neo 10R, OnePlus Nord CE 4 Lite, Redmi A4 यांसारखे बजेट फोन मोठ्या सवलतीत मिळत आहेत.