Youtube New Rules : यूट्यूबच्या नियमात मोठा बदल! मेहनत करून बनवलेल्या 'या' व्हिडीओंची कमाई बंद, मोनेटायझेशनसाठी भयानक अटी व शर्ती..

YouTube new policy 2025 guidelines for monetisation : यूट्यूब १५ जुलै २०२५ पासून नवीन कमाई धोरण लागू करत आहे.
YouTube monetisation policy update 2025 low effort videos banned
YouTube monetisation policy update 2025 low effort videos bannedesakal
Updated on

थोडक्यात..

  • यूट्यूब 15 जुलैपासून नवीन कमाईचे नियम लागू करत आहे.

  • एकसंध आणि कमी मेहनतीच्या व्हिडीओंना कमाईवर मर्यादा येणार.

  • पात्रतेसाठी सबस्क्रायबर्स व व्ह्यूजचे ठराविक निकष कायम आहेत.

व्हिडीओ निर्मात्यांसाठी एक मोठी अपडेट येणार आहे. YouTube आता आपल्या कमाईच्या धोरणात मोठा बदल करत असून, 15 जुलै 2025 पासून नवीन मोनेटायझेशन नियम लागू करत आहे. यामुळे कमी मेहनतीने तयार केलेले, एकसंध किंवा भराभर तयार होणारे व्हिडीओ बनवणाऱ्या चॅनल्सना कमाईपासून वंचित राहावं लागू शकतं.

कोणत्या प्रकारच्या व्हिडीओंना फटका?

YouTube च्या नव्या धोरणानुसार काही प्रकारचे व्हिडीओ मोनेटायझेशनसाठी अयोग्य ठरू शकतात

  • जर तुम्ही दुसऱ्यांचे कंटेंट बदल न करता थेट टाकत असाल, तर ते आता मोनेटायझेशनसाठी चालणार नाही.

  • जसे की सतत एकाच पद्धतीने केलेले, केवळ व्ह्यूज मिळवण्यासाठी बनवलेले व्हिडीओ. YouTube म्हणतो, कंटेंट entertaining (मनोरंजक) किंवा educational (शैक्षणिक) असणे गरजेचे आहे.

YouTube Partner Programme मध्ये सहभागी होण्यासाठी पात्रता काय?

कोणतेही चॅनल YouTube Partner Programme (YPP) मध्ये सहभागी होण्यासाठी खालील पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक आहे

  • किमान 1,000 सबस्क्राईबर्स असणे.

  • मागील 12 महिन्यांत 4,000 सार्वजनिक वॉच अवर्स किंवा

  • मागील 90 दिवसांत 1 कोटी Shorts व्ह्यूज मिळवलेले असणे.

YouTube monetisation policy update 2025 low effort videos banned
Sabih Khan : जागतिक नेतृत्वात ऐतिहासिक बदल! भारतीय वंशाचे सबीह खान बनले अ‍ॅपलचे नवे COO, मुरादाबाद ते सॅन फ्रान्सिस्को..कसा होता प्रवास

नवीन नियमांचा परिणाम कोणावर होणार?

सध्या यूट्यूबने हे स्पष्ट केलेलं नाही की नवीन नियमांचं उल्लंघन केल्यास चॅनलवर काय परिणाम होतील. कोणतीही दंडात्मक कारवाई, सस्पेंशन किंवा स्ट्राइकबाबत ठोस माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे अनेक क्रिएटर्स सध्या संभ्रमात आहेत.

नव्या धोरणांमध्ये YouTube ने थेट AI वापरून बनवलेल्या व्हिडीओंविषयी काही स्पष्टपणे नमूद केलेलं नाही. मात् कंपनीच्या नव्या धोरणातून असा अंदाज लावता येतो की भविष्यात अशा कंटेंटवर अधिक काटेकोर नजर ठेवली जाऊ शकते.

याच महिन्यात YouTube ने १६ वर्षांखालील युजर्ससाठीही नियम कठोर केले आहेत. आता १६ वर्षांखालील युजर्सना पालकांच्या देखरेखीशिवाय लाईव्ह स्ट्रीमिंग करण्यास परवानगी नाही

YouTube monetisation policy update 2025 low effort videos banned
लॉन्च झाला स्वस्तात मस्त Moto G96 5G स्मार्टफोन; दमदार फीचर्स, सोनीचा कॅमेरा अन् किंमत फक्त..

यूट्यूबच्या प्लॅटफॉर्मवर क्रिएटिव गोष्टींना प्रोत्साहन देण्याचा आणि कंटेंटच्या नावाखाली केवळ व्ह्यूजसाठी बनवलेले व्हिडीओ थांबवण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे ज्यांचे कंटेंट दर्जेदार, वैचारिक किंवा मनोरंजक आहेत, त्यांच्यासाठी ही एक संधी असू शकते. मात्र स्वस्तात आणि पटकन कंटेंट तयार करणाऱ्यांसाठी आव्हानं वाढणार आहेत.

FAQs

  1. YouTube चे नवीन कमाई धोरण कधीपासून लागू होईल?
    ➤ १५ जुलै २०२५ पासून हे धोरण अंमलात येणार आहे.

  2. नवीन धोरणात कोणत्या प्रकारचे व्हिडीओ मोनेटायझेशनसाठी अपात्र ठरतील?
    ➤ उचललेले, एकसंध आणि केवळ व्ह्यूजसाठी बनवलेले व्हिडीओ अपात्र ठरतील.

  3. YouTube Partner Program साठी पात्रता काय आहे?
    ➤ किमान १,००० सबस्क्रायबर्स आणि ४,००० वॉच अवर्स किंवा १० दशलक्ष Shorts व्ह्यूज लागतील.

  4. AI द्वारे बनवलेला कंटेंटही यामध्ये येतो का?
    ➤ अजून स्पष्ट नाही, पण नियम अधिक काटेकोर होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com