
Ambrane Wise Eon watch : चार्जिंग केल्यावर १० दिवस चालणारं २ हजारांचं स्मार्टवॉच
मुंबई : Ambrane Wise Eon watch लॉन्च करण्यात आले आहे. स्वस्त आणि वापरण्यासाठी मस्त असे हे घड्याळ आहे. यात ब्लूटूथ कॉलिंगसह व्हॉइस असिस्टंट सपोर्ट मिळेल. म्हणूनच जाणून घेऊ या या आधुनिक पद्धतीच्या घड्याळ्याविषयी....
Ambrane Wise Eonची वैशिष्ट्ये
या घड्याळाला १.६९ इंचांची स्क्रीन आहे. ४५० निट्स पीक ब्राइटनेससह २४०x२८० पिक्सल रिजॉल्यूशन देते. प्राणवायूची पातळी, स्पंदने, रक्तदाब, श्वसन, झोप या गोष्टींची मोजणीही या घड्याळाद्वारे करता येणार आहे.
एकदा चार्ज केल्यानंतर हे घड्याळ १० दिवस चालते. यात डायलपॅड, मायक्रोफोन, स्पीकरसुद्धा आहे. ब्लूटूथ कॉलिंगच्या मदतीने फोन उचलता आणि बंद करता येईल. यात ६०पेक्षा अधिक स्पोर्ट्स मोड देण्यात आले आहेत. पाणी आणि धुळीपासून संरक्षण करण्यासाठी IP68 रेटिंगसह हे घड्याळ येते.
या घड्याळात तीन गेम्स प्री-इन्स्टॉल करण्यात आले आहेत. याशिवाय गजर, स्मार्टवॉच, रिमोट कॅमेरा, म्युझिक प्लेयर अशा सुविधाही यात मिळतील. Ambrane Watch फ्लिपकार्टवर उपलब्ध असून त्याची किंमत १ हजार ९९९ आहे.
Web Title: Ambrane Wise Eon New Bluetooth Calling Smartwatch Launched Under Rs 1999
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..