आनंद महिंद्राचं मोठं पाऊल, Metaverse मध्ये उभं केलं शहर!

ट्विटरवर त्यांनी एक व्हिडिओ पोस्ट करून याविषयी माहिती दिली आहे.
Anand Mahindra Latest Tweet
Anand Mahindra Latest TweetSakal

आनंद महिंद्रा नेहमीच ट्विटरवर कार्यशील असून त्यावर चांगल्या बातम्या शेअर करत असतात. आता त्यांनी आपण मेटाव्हर्सच्या दुनियेत पाऊल ठेवल्याचे सांगितले आहे. त्यांनी एक व्हिडिओ पोस्ट करून लिहिले की, मेटाव्हर्समध्ये आमच्याबरोबर सामील व्हा, असे त्यांनी म्हटले आहे. (Anand Mahindra Latest Tweet)

Anand Mahindra Latest Tweet
१ एप्रिलपासून महागणार 'या' गोष्टी

ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये त्यांनी टेक महिंद्रा ही कंपनी मेटाव्हर्समध्ये काम करायाला सुरू करत असल्याचे म्हटले आहे. भविष्याची ही गरज आहे. जगात वेगवेगळे प्रयोग होत आहेत. Metaverse ही अशी एक जागा असेल जिथे कोणीही डिजिटल अवतारात सहभागी होऊ शकेल. तसेच हे जग तुम्हाला राहण्यासाठी एक नवीन जागा बनू शकतं, असंही त्यांनी ट्विटरवर म्हटलं आहे.

Anand Mahindra Latest Tweet
आनंद महिंद्रांचा फिटनेस फंडा माहितेय का? या चार गोष्टींवर देतात भर

टेक महिंद्राने केले तयार

ही मेटाव्हर्स स्पेस महिंद्रा ग्रुपच्या सॉफ्टवेअर कंपनी टेक महिंद्राने तयार केली आहे. या Simplicity मध्ये एक कार डीलर (DealerVerse), NFT मार्केटप्लेस, एक आभासी बँक मेटा बँक आणि गेमिंग सेंटर असेल. हे प्लॅटफॉर्म लोकांसाठी NFT ट्रेडिंग आणि ब्लॉकचेन प्लॅटफॉर्म म्हणून काम करेल. तसेच डिझाईन आणि कंटेटसाठी इमर्सिव डिजिटल आणि व्यावसायिक अनुभव देईल.

Anand Mahindra Latest Tweet
'मेटाव्हर्स'चं जग नेमकं काय आहे? आपल्यापासून ते अजून किती दूर आहे?

मेटाव्हर्स म्हणजे काय

हा एक 3D आभासी जग आहे. हे ऑगमेंटेड रिअॅलिटी आणि व्हर्च्युअल रिअॅलिटीवर आधारित आहे.

या तंत्रज्ञानाच्या मदतीने, एखादी व्यक्ती पूर्णपणे आभासी जगात प्रवेश करते. त्या व्यक्तीला आभासी जग खरेच असल्याचे वाटू लागते.

Metaverse च्या मदतीने तुम्हाला आभासी जगात जे काही करायचे आहे ते त्याचा अनुभव तुम्हाला घेता येतो.

मेटाव्हर्सच्या मदतीने, तुम्ही हजारो किलोमीटर दूर असलेल्या आभासी जगातल्या तुमच्या मित्रांसोबत चहा आणि कॉफी पिऊ शकता.

मेटाव्हर्सला सोशल मीडियाचे भविष्य म्हटले जाते. नुकतेच फेसबुकने आपले नाव बदलून मेटा केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com