'मेटाव्हर्स'चं जग नेमकं काय आहे? आपल्यापासून ते अजून किती दूर आहे?

what is metaverse and know how close we are to this virtual environment Marathi news
what is metaverse and know how close we are to this virtual environment Marathi news

या आठवड्यात मायक्रोसॉफ्टच्या सत्या नाडेला (Satya Nadella) यांनी ७० बिलियन डॉलर्स ह्या अवाढव्य किमतीला "ऍक्टिव्हिजन ब्लिझार्ड" हि गेमिंग कंपनी विकत घेण्याची घोषणा केल्यापासून “मेटाव्हर्स” (Metaverse) पुन्हा एकदा चर्चेत आलंय. तसं पाहिलं तर गेल्या वर्ष अखेर पासून हा शब्द खूपच चर्चेत आहेच. अगदी मार्क झुकरबर्ग यांनी फेसबुक (Facebook) कंपनीचे चक्क नावच बदलून "मेटा" (Meta) असं केल्यापासूनच. आता मात्र "मेटाव्हर्स" हा विषय टेक्नॉलॉजी क्षेत्राच्या बाहेरही चर्चेत आलाय. आंतरराष्ट्रीय माध्यमांनी त्याची दखल घेऊन त्यावर कव्हरेज हि सुरु केलंय. तसा हा विषय टेक्नॉलॉजी क्षेत्रासाठी नवीन नाही आणि तो १-२ कंपन्यांपुरताहि पर्यादित नाही. मायक्रोसॉफ्ट, फेसबुक शिवाय फोर्टनाईट, रॉब्लॉक्स इत्यादी अनेक कंपन्यांनी याबद्दल घोषणा केल्या आहेत. पण त्याबद्दल खूप लोकांनी इतक्या वेगवेगळ्या दृष्टीकोनातून लिहिलं आहे की त्याची अवस्था आता त्या "हत्ती आणि सात अंध" दंतकथे प्रमाणे झाली आहे. आपापल्या परीने चाचपताना कुणाला हा हत्ती म्हणजे सोंडेच्या आकाराचा वाटतो, कुणाला शेपटीच्या, तर कुणाला भल्या मोठ्या पोटाचा. पण हा हत्ती पूर्णपणे आहे तरी कसा?

काय असणार आहे हे मेटाव्हर्स? (What is Metaverse?)

मेटाव्हर्स असेल एक आभासी जग. अगदी थोडक्यात सांगायचं तर हे असणार आहे इंटरनेटचं भविष्यातलं रुप! आणि इतकं सर्वव्यापी असेल कि ते “फिजिकल” आणि “व्हर्च्युअल” अशा दोन्ही जगांना जोडणारं असेल. हा शब्द वापरात आणल्याचे श्रेय लेखक नील स्टीफन्सन यांना जातं. त्यांच्या १९९२ च्या सायन्स फिक्शन "स्नो क्रॅश" कादंबरीमध्ये त्यांनी "मेटाव्हर्स" आणि त्यातल्या वास्तववादी 3D इमारती आणि इतर आभासी वास्तव वातावरणात भेटलेल्या सजीव अवतारांची कल्पना केली होती. हे तेव्हा अगदीच सायन्स फिक्शन होतं, पण गेल्या काही वर्षात ह्या तंत्रज्ञानाला लागणारी अनेक साधनसामुग्री जमा होत आहे. त्यात Virtual reality (आभासी वास्तव), Augmented reality (संवर्धित वास्तव), 3D होलोग्राफिक अवतार, व्हिडिओ आणि संवादाची इतर माध्यमे समाविष्ट आहेत. सुरुवातीला आणि अजूनही वेगवेगळी असणारी ही तंत्रज्ञाने आणि अँप्लिकेशन्स (अनुभव) आता मेटाव्हर्ससाठी एकत्र बांधले जातील आणि हे जग जसजसे विस्तारत जाईल, तसतसे ते तुम्हाला लांबूनही “व्हर्चुअली एकत्र” राहण्यासाठी हायपर-रिअल पर्यायी जग तयार होईल.

what is metaverse and know how close we are to this virtual environment Marathi news
'मेटाव्हर्स' म्हणजे नेमकं काय? साऱ्या जगात सुरु आहे चर्चा

मेटाव्हर्स तसं आधीच आलंय

हे सगळे विचित्र वाटत असेल तर तुमच्या मुलांना विडिओ गेम्स बद्दल विचारा. त्यांच्यासाठी हे जग त्या त्या गेम पुरते आधीच अस्तित्वात आहे. आता फक्त हि वेगवेगळी जगं एकत्रित येतील आणि तुमचा ID सुद्धा एकच असेल ज्याद्वारे तुमचं व्यक्तिमत्व सदैव तुमच्या सोबत असेल. आज तुम्ही काही डिजिटल सेवा एका अँप मध्ये विकत घेतली तर ती दुसऱ्या अँप मध्ये वापरता येत नाही. तेवढेच काय तुमचा ID सुद्धा बदलतो. हे “तुकड्यातुकड्यांचे” (silo) इंटरनेट एकत्र आणणे हे ही मेटाव्हर्सचं एक उद्दिष्ट आहे. मग ह्या जगात करन्सी पण डिजिटल असेल. मग त्या साठी cryptocurrencies आल्या. वेगवेगळी डिजिटल कॉईन्स आणि टोकन्स आली. हे सगळेही सध्या खूप फोकस मध्ये आहे.

ह्या मेटाव्हर्स मध्ये तुम्हाला तुमचं स्वतःचं घर आणि ऑफिस सुद्धा virtual बांधता येईल. त्यात सजावटीचे फोटो, वॉलपेपर्स सुद्धा डिजिटली विकत घेता येतील. तुम्हाला मीटिंग साठी लागणारे, पार्टी साठी लागणारे कपडे विकत घेता येतील. हे सध्या बऱ्याच गेम्स मध्ये आधीच मिळतं पण आता ते तुम्हाला त्या गेमच्या बाहेरच्या अप्स मध्ये हि वापरात येईल. काही महिन्या पूर्वी "Beeple" नावाच्या डिजिटल आर्टिस्टची पेंटिंग्ज ६९ मिलियन डॉलर्सला विकली गेली. (ह्या डिजिटल आर्टस् ला NFT म्हणतात) ही किंमत योग्य आहे का, याबद्दल वाद ही झाला. जर फोटो किंवा पैंटिंग्स इंटरनेटवर कुणालाही सहज कॉपी करता येत असतील तर एवढी किंमत का आली? त्याचं उत्तर "आजकाल लिलावामध्ये ओरिजिनल आर्टपीस प्रचंड किमतीला का विकले जातात?" यात आहे. जसे आज कुणाला ओरिजिनल पिकासो सारखं प्रचंड लोकप्रिय पैंटिंग घ्यायचे असेल तर अव्वाच्या सव्वा किंमत मोजावी लागते. तीच गोष्ट ह्या NFTs ची होण्याची शक्यता आहे. crypto टेक्निक्स मुळे पेंटींगचा मालक कोण आहे हे ट्रॅक करणंहि खूप सोपं होणार आहे. काही दशकांनंतर हि पेंटिंग्ज प्रचंड किमतीला विकली जातील म्हणून ती घेणाऱ्याची संख्याहि वाढते आहे.

what is metaverse and know how close we are to this virtual environment Marathi news
Amazon Sale : गेमिंग लॅपटॉप, कन्सोल अन् ॲक्सेसरीजवर मिळतेय बंपर सूट

आताच का?

गेल्या दशकात इंटरनेट चा प्रसार इतक्या झपाट्याने वाढला आहे कि आता ते जवळपास सगळ्या कानाकोपऱ्यांत पोहोचलं आहे. सध्याच्या ग्लोबल पॅंडेमिक मुळे संपूर्ण जग हादरले असताना टेकनॉलॉजिचे जग चालू ठेवायला किती फायदे झाले हे अनेकांना "घरबसल्या" (वर्क फ्रॉम होम मुळे!) अनुभवयाला मिळालं. इंटरनेट चा आधार घेत शाळा, वर्क फ्रॉम होम, मीटिंग्ज तर करता आल्याच, पण या काळात अमेझॉन , फ्लिपकार्ट सारख्या ईकॉमर्स कंपन्यांच्या मदतीने सोशल डिस्टंसिंग ही करता आलं.

आता जगभरात ईकॉमर्सला आता प्रचंड गती मिळाली आहे. झूम विडिओ सारख्या काही कंपन्या तर ह्या काळात कैक पटीने मोठ्या झाल्या. यापूर्वीच इंटरनेट मुळे नवीन इकॉनॉमी तयार तर होत होतीच, पण या सगळ्यातून आता टेकनॉलॉजि आणि इंटरनेट यापुढेही मानवी आयुष्यावर खूप मोठा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट करू शकतात याची छोटी झलक मिळाली आहे. काही टेकनॉलॉजी क्षेत्रात तर काही दशकांचं अडॉप्शन काही महिन्यात झालं. आता नुसतेच झूम विडिओच्या २D स्क्रीन दिसणारे लोक त्यांच्या स्टार वॉर्स मुव्ही प्रमाणे समोर ३D मध्ये अवतरले तर? मीटिंग, पार्टी, गप्पा, पत्ते , खेळ, अगदी मेहफिल आणि कॉन्फरन्स हे हि सगळे करत आले तर? ह्या सगळ्याचे उत्तर मेटाव्हर्स मध्ये आहे. पण त्यासाठी ३D ग्लासेस लागतील असेच नाही. ज्याच्याकडे जे डिवाइस असेल त्याने त्त्यांना जॉईन करता येईल, हे मेटाव्हर्स चे प्रॉमिस आहे.

what is metaverse and know how close we are to this virtual environment Marathi news
कमी किंमतीत एअरटेलचे ५ पैसा वसूल प्लॅन्स, किंमत २५० पेक्षा कमी

पण असे नक्की होऊ शकेल?

अनेकांना हे सगळे कधी साध्य होणार नाही असेही वाटते. पण विचार करा दहा वर्षांपूर्वी लोकांना माहितहि नसणारी "गूगल, अमेझॉन, फेसबुक, ट्विटर" हि नावे आता घरगुती झाली आहेत. जगाच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या माणसाला खिशातला फोन काढून एक सेकंदात बोलता येईल हि गोष्ट अगदी काही वर्षांपूर्वी अशक्य वाटत होती. राहिली गोष्ट व्हर्चुअल गोष्टींवर खर्च करण्याची. पार्टी किंवा समारंभा मध्ये तिथे असलेल्या पाहुण्यांना कडे दुर्लक्ष करून फेसबुक वर टाकण्या साठी फोटो काढणाऱ्यांची संख्या आज किती आहे? गेम्स वर होणार खर्च वाढतो आहे. डिजिटल आर्ट फोफावते आहे. व्हर्चुअल कॉन्सर्ट्स हि वाढताहेत. याच वेगाने दिवसाचा जेवढा वेळ माणसे स्क्रीनकडे बघत घालवतात तो जेव्हा प्रत्यक्ष समोरासमोर बसून बोलण्यापेक्षा जास्त होईल, तेव्हा मेटाव्हर्स आपसूकच आलेले असेल. मग ह्या सगळ्या गोष्टी शक्य वाटायला लागतील.

तसे आपल्या पुराणात क्षणात प्रकट होणाऱ्या आणि अंतर्धान पावणाऱ्या देवदानवांचे अनेक दाखले आहेत. वेगवेगळे "अवतार" धारण करण्याच्या ही कथा आहेत. इतकेच नव्हे इंग्लिश मध्ये आणि टेकनॉलॉजीमध्ये आता सर्रास वापरला जाणारा शब्द "अँवाटार" म्हणजे आपला "अवतार" हा शब्द. हे सगळे पाहिले आता मात्र जग खऱ्या अर्थाने "मायाजालाकडे" (metaverse) निघाले आहे असे म्हणायला हरकत नाही!

लेखक - संदीप कामत

(लेखक कॅलिफोर्निया मध्ये टेकनॉलॉजी क्षेत्रात गेली दोन दशके कार्यरत आहेत. Twitter : @sankam )

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com