Satellite Internet : स्टारलिंकला विसराच! 'ही' भारतीय कंपनी सुरू करणार सॅटेलाईट ब्रॉडबँड सेवा, मिळणार एकदम स्वस्तात इंटरनेट

Ananth technologies GEO Satellite Internet : अनंत टेक्नॉलॉजीजने स्वदेशी GEO उपग्रहाद्वारे भारतात उपग्रह ब्रॉडबँड सेवा सुरू करण्याची तयारी केली आहे. यामुळे भारतात आत्मनिर्भर इंटरनेट सेवा युगाची सुरुवात होणार आहे.
Ananth technologies GEO Satellite Internet
Ananth technologies GEO Satellite Internetesakal
Updated on
  • अनंत टेक्नॉलॉजीजने स्वदेशी GEO उपग्रहाद्वारे ब्रॉडबँड सेवा सुरू करण्याची योजना आखली आहे.

  • या उपग्रहामुळे संपूर्ण भारतात अखंड इंटरनेट कव्हरेज शक्य होणार आहे.

  • ही सेवा परदेशी कंपन्यांना स्पर्धा देत आत्मनिर्भर भारताचे प्रतीक ठरणार आहे.

भारतीय उपग्रह संप्रेषणाच्या क्षेत्रात एक क्रांतिकारी पाऊल उचललं जात आहे. परदेशी कंपन्यांच्या मक्तेदारीला टक्कर देण्यासाठी भारताचीच ‘अनंत टेक्नॉलॉजीज’ ही खासगी कंपनी देशात उपग्रह ब्रॉडबँड सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहे. यासाठी कंपनीला ‘IN-SPACe’ या सरकारी संस्थेकडून अधिकृत मान्यता मिळाली असून लवकरच ही सेवा सुरू होणार आहे.

यामुळे इलॉन मस्कची स्टारलिंक,अमेझॉनची क्यूपर तसेच भारती एअरटेल व जिओच्या भागीदारीतील ‘वनवेब’ यांसारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांना आता भारतात स्वदेशी स्पर्धेचा सामना करावा लागणार आहे. विशेष म्हणजे ही पहिलीच वेळ आहे जेव्हा एखादी भारतीय खासगी कंपनी स्वदेशी बनावटीच्या उपग्रहांच्या सहाय्याने उपग्रह ब्रॉडबँड सेवा देणार आहे.

अनंत टेक्नॉलॉजीजने जिओस्टेशनरी (GEO) कक्षा असलेला सुमारे ४ टन वजनाचा उपग्रह अवकाशात सोडण्याची योजना आखली आहे. या प्रकल्पासाठी सुमारे ३,००० कोटी रुपयांची सुरुवातीची गुंतवणूक करण्यात येणार आहे. पुढील विस्तारासाठी कंपनी अजून भांडवल उभारण्याच्या प्रयत्नात आहे.

अन्य स्पर्धक कंपन्या आपले उपग्रह पृथ्वीपासून ४०० ते १,२०० किलोमीटर अंतरावर असलेल्या लो-अर्थ ऑर्बिट (LEO) मध्ये ठेवतात. मात्र, अनंत टेक्नॉलॉजीजचा उपग्रह ३५,००० किलोमीटर उंचीवर असणार आहे. त्यामुळे उपग्रह भारताच्या पूर्ण भूभागावर स्थिर राहून अखंड ब्रॉडबँड सेवा देऊ शकतो.

Ananth technologies GEO Satellite Internet
AC Tips : पावसाळ्यात एसी अन् फॅन वापरताना अजिबात करू नका 'ही' चूक; नाहीतर वीजबिल वाढणारच..

तज्ज्ञांच्या मते, LEO उपग्रह तुलनेने कमी विलंब (latency) असलेल्या आणि वेगवान इंटरनेट सेवा देतात. मात्र त्यासाठी अनेक उपग्रहांचे जाळे तयार करावे लागते. दुसरीकडे GEO उपग्रहांना विलंब जरी जास्त असतो, तरी त्याचा कव्हरेज क्षेत्रफळ मोठं असतं म्हणजे एकाच उपग्रहाने संपूर्ण भारताला कव्हर करता येते. ग्रामीण भागांपर्यंत सेवा पोहोचवण्यासाठी ही योजना अत्यंत प्रभावी ठरू शकते.

Ananth technologies GEO Satellite Internet
Mobile Recharge : मोबाईल वापरकर्त्यांना झटका! रिचार्जचे दर 10-12% ने पुन्हा महागणार, कोणत्या कंपनीचे किती पैसे? जाणून घ्या..

भारतातील सॅटेलाईट इंटरनेट क्षेत्र अजूनही विकसनशील अवस्थेत आहे. आजवर प्रामुख्याने ISRO (इस्रो) कडून या क्षेत्रातील गरजा पूर्ण केल्या जात होत्या. मात्र सरकार आता खासगी क्षेत्रातील स्थानिक कंपन्यांना यामध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देत आहे.

अनंत टेक्नॉलॉजीजच्या या पुढाकारामुळे भारतातील डिजिटल कनेक्टिव्हिटीमध्ये नवे पर्व सुरू होण्याची चिन्हं आहेत. एकीकडे परदेशी गुंतवणुकीचा दबाव असतानाच दुसरीकडे देशी कंपनीकडून आत्मनिर्भर भारताच्या दिशेने महत्त्वाचं पाऊल उचललं जात आहे.

FAQs

  1. अनंत टेक्नॉलॉजीज काय सेवा देणार आहे?
    – भारतात GEO उपग्रहाच्या माध्यमातून ब्रॉडबँड इंटरनेट सेवा देणार आहे.

  2. ही सेवा इतर कंपन्यांपेक्षा कशी वेगळी आहे?
    – ही सेवा पूर्णपणे स्वदेशी उपग्रहाद्वारे दिली जाणार आहे, जे एका उपग्रहाने संपूर्ण भारत कव्हर करू शकतो.

  3. यासाठी कोणती सरकारी मान्यता मिळाली आहे?
    – IN-SPACe या संस्थेकडून अधिकृत मान्यता प्राप्त झाली आहे.

  4. सेवेचा फायदा ग्रामीण भागांपर्यंत पोहोचेल का?
    – होय, मोठ्या कव्हरेजमुळे ही सेवा ग्रामीण भागांपर्यंत पोहोचू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com