किडनीचे पैसे सोडाचं, विद्यार्थीनीला बसला १६ लाखांना गंडा; वाचा संपूर्ण प्रकरण | Cyber Fraud | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cyber Fraud

Cyber Fraud: किडनीचे पैसे सोडाचं, विद्यार्थीनीला बसला १६ लाखांना गंडा; वाचा संपूर्ण प्रकरण

Cyber Fraud In Hyderabad: हैद्राबाद येथे नर्सिंगच्या विद्यार्थीनीसोबत सायबर फ्रॉडची धक्कादायक घटना घडली आहे. या विद्यार्थीनीला तब्बल १६ लाख रुपयांना गंडा बसला आहे. वडिलांच्या बँक खात्यातून काढलेले २ लाख रुपये परत करण्याचा प्रयत्न करताना ही फसवणूक झाली. २ लाख रुपये पुन्हा खात्यात जमा करण्यासाठी ही तरुणी किडनी विकण्याचा प्रयत्न करत होती.

रिपोर्टनुसार, ही तरुणी नर्सिंग कोर्ससाठी हैद्राबाद येथे आली होती. तिने वडिलांच्या यूपीआय अकाउंटचा वापर करून घड्याळ, ड्रेस आणि इतर वस्तू ऑनलाइन खरेदी केल्या. वडिलांना या खर्चाची माहिती मिळण्याआधी पैसे परत खात्यात जमा करण्याचा तरुणीचा विचार होता. यासाठी ती तरुणी किडनी विकून ऑनलाइन पैसे कमवण्याचा मार्ग शोधत होती.

हेही वाचा : प्राप्तिकर- कशाने मिळेल सूट, कशावर भरावा लागेल कर....

ऑनलाइन सर्च करताना विद्यार्थीनीला किडनीची त्वरित गरज असल्याची एक जाहिरात देखील दिसली. तसेच, डोनरला ७ कोटी रुपये दिले जातील, असेही जाहिरातीत म्हटले होते. यासाठी विद्यार्थीनीने डॉ. प्रवीण राज नावाच्या व्यक्तीने संपर्क साधला. या व्यक्तीने सुरुवातीच्या टप्प्यात ३.५ कोटी रुपये व नंतर इतर रक्कम दिली जाईल, असे सांगितले. एवढेच नाही तर विद्यार्थीनीच्या मेडिकल रिपोर्टची देखील मागणी केली.

यानंतर या व्यक्तीने कर आणि पोलीस व्हेरिफेकशनच्या नावाखाली मुलीकडून तब्बल १६ लाख रुपये वसूल केले. विद्यार्थीनीने पैसे परत मागितल्यावर दिल्लीला जाण्यास सांगितले. मात्र, दिल्लीला गेल्यावर हा पत्ता खोटा असल्याचे तिला आढळले. या तरुणीने वडिलांच्या बँक खात्यातून १६ लाख रुपये काढले होते.

हेही वाचा: Mobile Data: माझ्या मोबाईलचं नेट संपलं कसं? संसदेत जोरदार चर्चा, मंत्र्यांनी दिलं मजेशीर उत्तर

या विद्यार्थीनीच्या वडिलांनी सांगितले की, एक एटीएम कार्ड मुलीला दिले होते. वडिलांनी मुलीला घरी येण्यास देखील सांगितले होते. मात्र, ही विद्यार्थीनी हॉस्टेलवर थेट दुसऱ्या ठिकाणी गेली होती. अखेर पोलिसांनी तपास सुरू केल्यावर विद्यार्थीनी तिच्या मैत्रिणीच्या घरी असल्याचे समोर आले.

हेही वाचा: Sim Card: तुमचे नाव वापरून किती जणांनी घेतले आहे सिम कार्ड? 'या' सोप्या ट्रिकने घ्या जाणून

टॅग्स :Cyber Fraudcyber attack