माझ्या मोबाईलचं नेट संपलं कसं? संसदेत जोरदार चर्चा, मंत्र्यांनी दिलं मजेशीर उत्तर| Mobile Data | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mobile Data

Mobile Data: माझ्या मोबाईलचं नेट संपलं कसं? संसदेत जोरदार चर्चा, मंत्र्यांनी दिलं मजेशीर उत्तर

Mobile Data Use: गेल्याकाही वर्षात मोबाइल डेटाचा वापर प्रचंड वाढला आहे. टेलिकॉम कंपन्या देखील रिचार्ज प्लॅन्समध्ये दररोज १ जीबीपासून ते ३ जीबीपर्यंत डेटा ऑफर करतात. विशेष म्हणजे गेल्याकाही वर्षात डेटाची किंमत देखील कमी झाली आहे. अनेकदा असे होते की मोबाइलचा वापर न करताच डेटा संपतो. मात्र, हे केवळ सर्वसामान्यांसोबतच घडत नाही, तर काँग्रेसच्या खासदारासोबत देखील घडले आहे. काँग्रेसचे खासदार जसबीर सिंह गिलने याच समस्येबाबत संसदेत प्रश्न उपस्थित केले.

हेही वाचा : प्राप्तिकर- कशाने मिळेल सूट, कशावर भरावा लागेल कर....

झोपल्यानंतर कोण वापरते मोबाइल डेटा?

झोपल्यानंतर मोबाइल डेटाचा वापर भूत करते का? असा प्रश्न काँग्रेस खासदाराने आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांना विचारला आहे. ते म्हणाले की, एअरटेल आणि जिओ हे यूजर्सची लूट करत आहेत. रात्री फोन बंद करून झोपलो आणि उठल्यावर मोबाइल डेटा संपलेला असतो. या डेटाचा वापर भूत करते का?, असा प्रश्न त्यांनी केली.

हेही वाचा: Sim Card: तुमचे नाव वापरून किती जणांनी घेतले आहे सिम कार्ड? 'या' सोप्या ट्रिकने घ्या जाणून

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव बीएसएनएल, टेलिकॉम सर्व्हिस आणि ५जी बाबत माहिती देत असताना काँग्रेस खासदाराने हे प्रश्न उपस्थित केले. यावेळी त्यांनी काँग्रेसवर निशाणा देखील साधला. बीएसएनएल फक्त काही ठराविक मंत्र्यांच्या हातातील खेळणे होती, मात्र आता ते दिवस संपले आहेत. अशी जोरदार टीका करत वैष्णव यांनी यूपीए सरकारच्या कार्यकाळावर टीका केली.

जसबीर सिंह गिल यांच्या प्रश्नावर उत्तर देताना केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काँग्रेसवर टीका केली. यावेळी वैष्णव म्हणाले की, तुम्ही भुताविषयी बोलता. परंतु, तेच भूत १ जीबी डेटासाठी २०० रुपये घेत होते. आता १ जीबी डेटासाठी २० रुपयांपेक्षा कमी खर्च येतो. अश्विनी वैष्णव यांनी आरोप केले की, यूपीए सरकारच्या काळात BSNL चा बहुतांश फंड डायवर्ट करण्यात आल्याने कंपनीची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. BSNL चे लवकरच अच्छे दिन सुरू होतील, असेही ते म्हणाले.

हेही वाचा: McLaren 765LT: देशातील सर्वात महागडी कार खरेदी करणारा नसीर खान नक्की करतो काय? जाणून घ्या