OS Update : अँड्रॉईड 14 अन् iOS 17 ओएस अपडेट करावा की नको? यूजर्सना येतायत भरपूर अडचणी

Android 14 Issue : सॉफ्टवेअर अपडेटनंतर स्क्रीनवर ग्रीन डॉट येत असल्याचं यूजर्सनी म्हटलं आहे.
Android Apple OS Update
Android Apple OS UpdateeSakal

गुगल आणि अ‍ॅपलने काही दिवसांपूर्वीच आपापल्या नवीन ऑपरेटिंग सिस्टीम लाँच केल्या आहेत. गुगलने पिक्सेल 8 फोनसोबत अँड्रॉईड 14 लाँच केले, तर अ‍ॅपलने आयफोन 15 सोबत iOS 17 लाँच केले आहे. मात्र या दोन्ही अपडेट्समुळे यूजर्सना अडचणी येत असल्याचं समोर आलं आहे.

टिपस्टर मुकूल शर्मा याने आपल्या एक्स हँडलवरुन अँड्रॉईड 14 मध्ये येणाऱ्या अडचणींची माहिती शेअर केली आहे. मुकूलने आपला पिक्सेल 7 स्मार्टफोन अपडेट केल्यानंतर त्यामध्ये Android 14 OS इन्स्टॉल झाली. यानंतर आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर एक हिरवा डॉट आला असल्याचं त्याने सांगितलं आहे.

Android Apple OS Update
iPhone 15 Pro : ग्राहकांच्या तक्रारी! फोन गरम होण्याबाबत Apple ने दिलं स्पष्टीकरण

याचे फोटो देखील त्याने पोस्ट केलं आहे. मुकूल आपल्या पोस्टमध्ये म्हणतो, की काही वेळा फोन रिस्टार्ट केल्यानंतर हा डॉट गायब झाला होता, मात्र फोन चार्जिंगला लावल्यानंतर तो परत आला.

आयफोनमध्येही प्रॉब्लेम

एका आयफोन यूजरने एक्सवर आपली अडचण शेअर केली आहे. आयफोन 13 या फोनमध्ये त्याने नवीन iOS 17 OS इन्स्टॉल केली होती. यानंतर आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर एका बाजूला हिरव्या रंगाची रेष दिसत असल्याचं या यूजरने म्हटलं आहे.

आयफोन 15 या फोनमध्ये काही प्रमाणात हीटिंग इश्यूदेखील येत होता. मात्र, अ‍ॅपलने आता याबाबत एक सॉफ्टवेअर अपडेट देऊन ही समस्या सोडवल्याचं म्हटलं आहे.

Android Apple OS Update
Pixel 8 India Price : 'पिक्सेल 8' अन् 'पिक्सेल 8 प्रो' लाँच, भारतात किती आहे किंमत अन् डिस्काउंट? जाणून घ्या

अपडेट करावा की नको?

एखादं नवीन सॉफ्टवेअऱ किंवा ऑपरेटिंग सिस्टीम लाँच झाल्यानंतर सुरूवातीला त्यात काही अडचणी येऊ शकतात. ही सामान्य बाब असून, कंपनी यावर काम करत असते. त्यामुळे सुरूवातीचे काही दिवस नवीन अपडेट फोनमध्ये इन्स्टॉल करण्याची घाई करू नये. काही दिवसांनी जेव्हा सर्व त्रुटी सुधारल्या जातात, तेव्हा आरामात फोन अपडेट करुन घ्यावा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com