esakal | नेटफ्लिक्सच्या फ्री अ‍ॅक्सेसचं आमिष पडेल महागात; गूगल प्ले स्टोअरवरील App धोक्याचं
sakal

बोलून बातमी शोधा

NETFLIX.j

एक नवीन ऍप अँड्रोईड गूगल प्ले स्टोअरवर आढलून आलंय. यामुळे युजर्सच्या मोबाईलमधून संपूर्ण डेटा चोरीला जाण्याचा धोका आहे.

नेटफ्लिक्सच्या फ्री अ‍ॅक्सेसचं आमिष पडेल महागात; गूगल प्ले स्टोअरवरील App धोक्याचं

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- एक नवीन ऍप अँड्रोईड गूगल प्ले स्टोअरवर आढलून आलंय. यामुळे युजर्सच्या मोबाईलमधून संपूर्ण डेटा चोरीला जाण्याचा धोका आहे. हे नवीन ऍप मोबाईलमध्ये डाऊनलोड झाल्यास तो संपूर्ण मोबाईलचा ताबा घेतो. विशेष म्हणजे मालवेयर युजर्सच्या व्हॉट्सअॅपमध्ये शिरून अॅटोमॅटिक पद्धतीने मेसेजला प्रतिसाद देऊ शकते. मालवेअर नेटफ्लिक्सच्या एका डमी व्हर्झनच्या माध्यमातून पसरला जात आहे. यात तुम्हाला दोन महिन्यांसाठी मोफत नेटफ्लिक्सचा अॅक्सेस देण्याची ऑफर दिली जाते. या टूलबाबत तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर गूगलने 'FlixOnline' नावाचे ऍप प्ले स्टोअरवरुन काढून टाकलं आहे. पण, तोपर्यंत 500 पेक्षा अधिक लोकांनी हे ऍप डाऊनलोट केले होते. 500 ही संख्या जास्त नसली तर हे मालवेयर इतर पद्धतीने दुसऱ्या मोबाईलमध्ये शिरु शकतो. 

एकदा का मोबाईलमध्ये 'FlixOnline' नावाचे अॅप डाऊनलोड केले की, ते युजर्सला ते नियम आणि अटी मान्य करायला लावते. त्यानंतर ऍप तुमच्या मोबाईलचा पूर्णपणे ताबा घेते. मोबाईलमधून तुमची संवेदनशील माहिती, पासवर्डची चोरी केली जाते. ऍप तुमचे नोटिफिकेशन वाचू शकते, एवढेच नाही तर त्याला रिप्ले देखील देऊ शकते. तुसऱ्या मोबाईलमध्ये याच माध्यमातून लिंक पाठवली जाते. लिंक ऑपन केली की, हे मालवेयर दुसऱ्यांच्या मोबाईलमध्ये शिरते. तुमचा महत्त्वाचा डेटा मिळवून तुमच्याकडून खंडणी गोळा केली जाऊ शकते. बँकेशी किंवा अनेक अकाऊंटशी निगडीत माहितीची, पासवर्डची चोरी केली जाते. त्यामुळे युजर्सला मोठा आर्थिक फटका सहन करावा लागू शकतो. 

मोदींविरोधात किती नोटीशी पाठवल्या? निवडणूक आयोगावर भडकल्या ममता बॅनर्जी

ऍप चुकीची माहिती पसरवण्याचा धोकाही आहे. ऍप व्हॉट्सऍप अकाऊंट हॅक करु शकते. शिवाय यामाध्यमातून तो अॅटोमॅटिक मेजेस सेंड करु शकतो. सध्या या ऍपवर बंदी आणण्यात आली आहे, पण भविष्यात या किंवा अशा ऍप्सच्या माध्यमातून लोकांना धोका आहे. वारंवार विविध माध्यमातून हॅकर्स युजर्सच्या मोबाईलमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत असतात. शिवाय प्रत्येकवेळी ते नवी क्लृप्ती वापरत असतात. त्यामुले अशा मालवेयरपासून वाचणं एक आव्हान बनले आहे. 

loading image