

"They Are Gambling with Our Lives": Ex-Anthropic Employee Jacob Coxon Warns of AI Endgame
esakal
AI Safety: कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) क्षेत्रातील आघाडीची कंपनी 'अँथ्रॉपिक' (Anthropic) चे माजी संशोधक जॅकब कॉक्सन (Jacob Coxon) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा देताना त्यांनी एआयच्या वेगाने होणाऱ्या विकासावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
तंत्रज्ञान कंपन्या ज्या वेगाने स्वयं-सुधारणा करणाऱ्या 'सुपरइंटेलिजन्स' (Self-improving Superintelligence) कडे वाटचाल करत आहेत, ते मानवी अस्तित्वासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकते, असा इशारा त्यांनी दिला आहे.
२७ वर्षीय जॅकब कॉक्सन यांनी गेल्या तीन वर्षांत ओपनएआय (OpenAI) आणि अँथ्रॉपिक या दोन्ही दिग्गज कंपन्यांमध्ये 'प्रीट्रेनिंग रिसर्च' (Pretraining Research) क्षेत्रात कार्य केले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर केलेल्या पोस्ट्समधून त्यांनी या धोक्यांकडे लक्ष वेधले.