गाडी चालवताना अपघात टाळण्यासाठी : अँटी स्लिप अलार्म | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Anti slip alarm

गाडी चालवताना अपघात टाळण्यासाठी : अँटी स्लिप अलार्म

कार चालविताना सुरक्षितता महत्त्वाची ठरते. कार खरेदी करताना सुरक्षिततेसंबंधीचे फीचर्स पाहिले जात असतात. तसे, सध्याच्या आधुनिक कारमध्ये सुरक्षिततेशी संबंधित विविध फीचर्स दिलेली असतात. आजच्या कारमध्ये अनेक अत्याधुनिक सुरक्षा गॅझेट्स मिळतात. यामध्ये सहा एअरबॅगपासून ते सीट बेल्ट अलार्म आणि अनेक प्रकारचे सेन्सर यांचा समावेश आहे. काही गाड्यांना ADAS फीचर देखील मिळू लागले आहे. हे फीचर्स कार अपघाताचे प्रमाण कमी करण्यास मदत करतात.

एवढ्या सुरक्षेनंतरही गाडी चालवताना मोठी अडचण दिसून येते. ती म्हणजे अचानक डोळा लागण्याची. अनेकवेळा गाडी चालवताना अचानक डोळ्यांवर झापड येते, झोप येते आणि अशा परिस्थितीत अपघात होण्याची शक्यता अधिक असते. अलीकडेच, प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा कार अपघातात मृत्यू झाल्यानंतर सुरक्षेबाबतची चर्चा वाढली आहे. अशा परिस्थितीत, एक गॅझेट उपलब्ध आहे, की जे ड्रायव्हरला झोप येण्‍यापासून रोखते. म्हणजेच, झोप येत असताना ते ड्रायव्हरला सावध करते, अलर्ट करते. ‘अँटी स्लिप आलार्म’ (Anti Sleep Alarm) नावाचे हे गॅझेट ड्रायव्हरच्या कानावर लावलेले असते, की जे ड्रायव्हरला झोप आल्यास सावध करते.

हे गॅझेट कसे काम करते?

हे गॅझेट अशा प्रकारे डिझाईन केले गेले आहे की, ते कानावर लावल्यानंतर ड्रायव्हरला झोप आल्याबरोबर सावध करते. यामध्ये स्विच ऑन आणि ऑफ बटण देण्यात आले आहेत. एका विशिष्ट कोनानंतर ड्रायव्हरचे डोके झुकताच हे गॅझेट अलार्म वाजवते. त्यामुळे चालक झोप येत असल्यास जागा होतो. याच प्रकारची विविध ब्रँडचे गॅझेट्स बाजारात आहेत, की जी गाडी चालवताना वापरता येतात. मात्र, ती वापरताना विशेषतः ऑनलाईन खरेदी करताना त्यांचे रिव्ह्यू पाहूनच ती खरेदी केलेली बरी. ‘अँटी स्लीप अलार्म’ हे गॅझेट ई-कॉमर्स साईट्सवर उपलब्ध असून त्याची किंमत ४९९ रुपये आहे.

Web Title: Anti Slip Alarm Avoid Accidents While Driving

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..