Apple AI : 'एआय'च्या शर्यतीत अ‍ॅपलची बाजी? एका वर्षात खरेदी केल्या तब्बल 30 स्टार्टअप कंपन्या

Apple Spending on AI : स्टॅटिका नावाच्या संस्थेने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. यामध्ये असं म्हटलं आहे की इतर कंपन्यांच्या तुलनेत एआयवर अ‍ॅपल सर्वाधिक खर्च करत आहे.
Apple AI
Apple AIeSakal

Apple Bought Startups : चॅटजीपीटी प्रसिद्ध झाल्यापासून जगभरात सगळीकडे आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, म्हणजेच एआयची चर्चा सुरू आहे. एकापाठोपाठ एक दिग्गज टेक कंपन्या आपआपले एआय टूल्स आणि चॅटबॉट्स लाँच करत आहेत. या सगळ्या शर्यतीत अ‍ॅपल ही कंपनी थोडी उशीराच आली. मात्र, आता शर्यतीत बूस्ट मिळावा यासाठी अ‍ॅपलने जोरदार फिल्डिंग लावली आहे.

स्टॅटिका नावाच्या संस्थेने एक अहवाल (Statica Report) प्रसिद्ध केला आहे. यामध्ये असं म्हटलं आहे की इतर कंपन्यांच्या तुलनेत एआयवर अ‍ॅपल सर्वाधिक खर्च करत आहे. आपल्या संपत्तीतील बराचसा भाग अ‍ॅपलने एआय कंपन्या खरेदी करण्यासाठी वापरला आहे. केवळ 2023 या वर्षातच अ‍ॅपलने तब्बल 30हून अधिक एआय स्टार्टअप कंपन्या खरेदी केल्या होत्या. (Apple bought Startup Companies)

Apple AI
LinkedIn AI : लिंक्ड-इनवर पहिला मेसेज काय पाठवायचा सुचत नाही? कंपनीचं एआय फीचर करेल तुमची मदत

चॅटजीपीटीला हरवण्यासाठी प्रयत्न

ओपनएआय (OpenAI) कंपनीने लाँच केलेल्या चॅटजीपीटी (ChatGPT) या प्लॅटफॉर्मला 50 टक्क्यांहून अधिक एआय ट्रॅफिक मिळालं आहे. यालाच मागे टाकण्यासाठी गुगल, मायक्रोसॉफ्ट, मेटा अशा दिग्गज कंपन्या प्रयत्न करत आहेत. मायक्रोसॉफ्टचं कोपायलेट (Microsogt Copilot), गुगलचं जेमिनी (बार्ड) असे प्लॅटफॉर्म नवनवीन फीचर्स आणि ऑफर्स देत आहेत. यातच आता अ‍ॅपलनेही उडी घेतली आहे. (Google Gemini)

कोण किती पाण्यात?

अ‍ॅपल कंपनी एआयच्या शर्यतीत (AI Race) सगळ्यात उशीरा आली असली, तरी अधिकाधिक तयार कंपन्या खरेदी करून ते इतरांना मागे टाकू शकतात. यासोबतच अ‍ॅपल एआय संबंधित विभागांमध्ये नवी भरतीही करत आहे. स्टॅटिकाच्या रिपोर्टनुसार, अ‍ॅपलने 2023 मध्ये 32 स्टार्टअप कंपन्या खरेदी केल्या. याच कालावधीमध्ये गुगलने 21, मेटाने 18 आणि मायक्रोसॉफ्टने 17 स्टार्टअप खरेदी केले होते.

Apple AI
Meta AI : 'डीपफेक' विरोधात मेटाचं मोठं पाऊल; फेसबुक-इन्स्टावर एआय-जनरेटेड फोटोंवर येणार विशेष लेबल

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com