Apple Event 2022 : iPhone 14, वॉच सीरीज 8 सह अनेक प्रॉडक्ट लॉन्च

Apple Event 2022
Apple Event 2022Sakal Digital

iPhone 14 Pro ची किंमत 

iPhone 14 Pro ची किंमत $999 आणि iPhone 14 Pro Max ची किंमत $1099 आहे.

iPhone 14 Pro मध्ये ऑलवेज ऑन डिस्प्ले फीचर

अँड्रॉइडमध्ये ऑलवेज ऑन डिस्प्ले फीचर अनेक वर्षांपासून दिले जात आहे, आता अॅपलने देखील आपल्या आयफोनमध्ये ते दिले आहे. हे फीचर फक्त प्रो मॉडेल्समध्ये उपलब्ध असेल. iPhone 14 Pro चा कॅमेरामध्ये खूप मोठा बदल करण्यात आला आहे सुधारला गेला आहे. त्याचा प्रायमरी कॅमेरा 48 मेगापिक्सलचा असणार आहे.

iPhone 14 Pro लॉंच

नवीन A16 Bionic चिपसेट iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max मध्ये देण्यात आले आहे. या दोन्ही फोनमध्ये ऑलवेज-ऑन डिस्प्ले फीचर देखील देण्यात आले आहे.

IPhone 14 ग्राहकांसाठी 16 सप्टेंबरपासून होणार बाजार पेठेत उपलब्ध

आयफोन 14 हा 16 सप्टेंबरपासून ग्राहकांसाठी बाजारपेठेत उपलब्ध होणार आहे, त्यामुळे तुम्ही लवकरच तो विकत घेऊ शकणार आहात.

Apple iPhone 14 आणि iPhone 14 Plus कॅमेरा

आयफोन 14 आणि आयफोन 14 प्लसमध्ये 12 मेगापिक्सलचे दोन कॅमेरा सेंसर दिले आहेत. परंतु कंपनीने 12 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरासाठी मोठा सेंसर वापरला गेला असल्याचा कंपनीचा दावा आहे. यामुळे कमी प्रकाशात देखील चांगले फोटो घेता येणार आहेत.

iphone 14 आणि iphone 14 plus किंमत

iPhone 14 ची किंमत $799 पासून सुरू होत आहे आणि iPhone 14 Plus ची किंमत $899 आहे.

iPhone 14 मध्ये सिम कार्ड स्लॉट नसणार

यावेळी कंपनीने iPhone 14 सह सिम कार्ड स्लॉट काढून टाकला आहे. हे फक्त अमेरिकेसाठी असले तरी भारतीय मॉडेल्समध्ये सिम कार्ड स्लॉट दिला जाऊ शकतो. iPhone 14 फक्त E-SIM वर काम करेल.

IPhone 14 मध्ये मिळणार इमरजेंसी SOS सैटेलाइट फीचर

अतिदुर्गम भागात मोबाईल संपर्क तुटल्यास सॅटेलाईटद्वारे संपर्क साधण्याची सुविधा मिळणार आहे. ज्या ठिकाणी सेल्युलर नेटवर्क उपलब्ध नाही, तेथे सॅटेलाइट कनेक्टिव्हिटीमुळे तुम्ही कॉल आणि मेसेज करू शकाल. हे विशेषतः दुर्गम भाग आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी आणले गेले आहे. या फीचर अंतर्गत सिमकार्डशिवाय सॅटेलाइटवरून कॉलिंग करता येणार आहे.

मिळणार पाच कलर ऑप्शन्स 

अॅपलचा दावा आहे की आयफोन 14 जास्त फास्ट असेल. तसेच Apple iPhone 14 पाच रंगात लॉंच करण्यात आला आहे. यामध्ये मिडनाईट, स्टारलाइट, ब्लू, पर्पल आणि रेड या रंगांचा समावेश आहे.

आयफोन 14 आणि 14 प्लस लॉंच

आयफोन 14 आणि 14 प्लस या फोनमध्ये वापरकर्त्यांना अधिक मोठा डिस्प्ले मिळणार आहे. A15 Bionic GPU आयफोन 14 मध्ये असणार आहे. हा सर्वांत वेगवान प्रोसेसर असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

Apple Airpods Pro 

Apple Airpods Pro मध्ये H2 चिप असेल. साऊंड क्वालिटीसाठी ऑडिओ ड्रायव्हरमध्येही बरेच बदल करण्यात आले आहेत. Airpods Pro ची किंमत $249 असेल. हे 29 सप्टेंबरपासून उपलब्ध होतील. AirPod Pro मध्ये तुम्हाला एकूण 30 तासांची बॅटरी लाइफ उपलब्ध असेल, तर केसशिवाय, तुम्हाला 6 तासांचा बॅकअप मिळेल. AirPods Pro ची किंमत $249 आहे.

Apple Watch SE

यावेळी देखील कंपनी Apple Watch SE लाँच करत आहे. हे घड्याळ लहान मुलांसाठी आहे, कारण त्यात दिलेले फीचर्स हे मुलांसाठी आहेत. यात क्रॅश डिटेक्शनचे फीचर देखील आहे, जे Apple Watch Series 8 मध्ये दिले आहे. इतर फीचर्स देखील Apple Watch Series 8 सारखेच आहेत, परंतु काही मुख्य वैशिष्ट्ये यात दिलेली नाहीत.

Apple Watch Ultra ची किंमत

ॲपल वॉच अल्ट्राची किंमत 799 डॉलर असेल आणि ते 23 सप्टेंबर पासून सर्वत्र उपलब्ध होईल.

Apple Watch Series 8 - किंमत

Apple Watch Series 8 च्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, GPS मॉडेलसाठी ते $249 आणि सेल्युलर मॉडेलसाठी $299 आहे. Apple Watch 16 सप्टेंबरपासून होणार उपलब्ध होणार आहे.

Appleची वॉच सीरीज 8 - सायकल ट्रॅकिंग फीचर

Apple चे म्हणणे आहे की सायकल ट्रॅकिंग फीचर तुमच्या iPhone वर वापरकर्त्यांना अलर्ट करेल आणि आगामी आरोग्य समस्यांवर लक्ष केंद्रित करण्यात मदत करेल. Apple ने असेही सांगितले की तुमचा सायकल ट्रॅकिंग डेटा तुमच्या डिव्हाइसवर एनक्रिप्ट केलेला असेल आणि फक्त तुमच्या पासकोड टच आयडी किंवा फेस आयडीने एक्सेस केला जाऊ शकतो.

pple Watch Series 8 मध्ये आहेत 'हे' फीचर्स   

Apple Watch Series 8 मध्ये अनेक फिटनेस आणि हेल्थ फीचर्स दिले जात आहेत. यामध्ये तुम्हाला स्लीप ट्रॅकिंग, ईसीजी, ब्लड ऑक्सिजन ट्रॅकिंग सारखे फीचर्स मिळतात. नवीन Apple वॉचचा लूक काहीसा जुन्या Apple वॉचसारखा आहे. पण त्यात नवीन काही असेल तर ते टेंपरेचर सेंसर. यात दोन सेन्सर दिले आहेत, जे शरीराचे तापमान आणि इतर महत्त्वाच्या गोष्टींचा ट्रॅक ठेवण्यास मदत करते.

Apple ची वॉच सीरीज 8 लाँच

Apple सिरीज 8 मध्ये अॅडव्हान्स्ड सायकल ट्रॅकिंग फीचर, ऑलवेज ऑन डिस्प्ले सारखी फीचर्स देण्यात आली आहेत. यात दिलेले क्रॅश डिटेक्टेड फीचर तुमचा गाडी चालवताना अपघात झाल्यास स्वतः आपोआप एमर्जेंसी कॉल लावेल. Apple Watch Series 8 एकदा फुल चार्ज केल्यास 36 तासांची बॅटरी लाईफ देते. तुम्हाला यामध्ये सेल्युलर कनेक्शनमध्ये इंटरनॅशनल रोमिंग देखील मिळेल.

Apple Watch Series 8 ऑलवेज ऑन डिस्प्ले सह येते, ही अतिशय स्टायलिश आणि अप्रतिम लूकसह येते. सोबतच वॉच पाणी आणि धूळीमध्ये देखील खराब होणार नाही. वॉच सीरीज 7 प्रमाणे, यामध्ये देखील अनेक मोड उपलब्ध आहेत, जे तुम्हाला फिट ठेवतील. टेंपरेचर सेन्सरसह वॉच सीरीज 8 सीरीज लाँच करण्यात आली आहे.

Apple फार आऊट इव्हेंट सुरू 

आयफोन 14 लाँच करण्याची चर्चा बऱ्याच दिवसांपासून होत आहे. Apple फार आऊट इव्हेंट सुरू झाला आहे. Apple चे सीईओ टिम कुक यांनी सांगितले की ते आज आयफोन, एअरपॉड्स आणि वॉच लॉन्च करणार आहेत.

हा इव्हेंट कुठे पाहाता येईल?

Apple चा हा इव्हेंट 7 सप्टेंबर रोजी रात्री 10:30 वाजता सुरू होईल. Apple इव्हेंटचे लाईव्हा स्ट्रिमींग पाहण्यासाठी तुम्ही Apple च्या अधिकृत साइट आणि YouTube हँडलला भेट देऊ शकता. त्याच वेळी, हा इव्हेंट तुम्ही सफारी ब्राउझरवरून देखील पाहू शकता..

इव्हेंटमध्ये काय होईल?

आज लॉंच होत असलेल्या iPhone 14 या सीरीजमध्ये अनेक खास फीचर्स मिळणार असल्याची जोरदार चर्चा होत आहे. याबद्दल मागच्या काही दिवसांपासून बातम्या देखील बाहेर येत आहेत. तसेच या इव्हेंटमध्ये एक स्मार्टवॉचही लाँच करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. सोबतच Airpods Pro 2 लाँच होणार असल्याची चर्चाही जोरात सुरू आहे. Apple ने या इव्हेंटला 'Far Out' ही टॅग लाईन वापरली आहे. कॅलिफोर्नियातील क्युपर्टिनो येथील अॅपलच्या मुख्यालयात असलेल्या स्टीव्ह जॉब्स थिएटरमध्ये हा कार्यक्रम होणार आहे.

जगभरात वाट पाहिली जात असलेली Apple ची iPhone 14 सीरीज लॉन्च करण्यात आली आहे. Apple चा 'फार आउट' इव्हेंट 7 सप्टेंबर रोजी पार पाडला. या इव्हेंटमध्ये Apple चे मुख्य कार्यकारी अधिकारी टिम कुक हे Apple चे नवीन डिव्हायसेस सादर केले. क्युपर्टिनो, कॅलिफोर्निया येथे Apple कंपनीच्या मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमादरम्यान, Apple ची लेटेस्ट आयफोन 14 सीरीज सह इतर अनेक प्रॉडक्ट लॉन्च करण्यात आले . या कार्यक्रमात अ‍ॅपल आपले नवीन आयफोन, अ‍ॅपल वॉच आणि एअरपॉड्स प्रो २ यांच्यासह आणखी अनेक प्रॉडक्ट्स लॉंच केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com