Apple Event : या दिवशी होणार Apple चा ब्रॅंड Event, iPad सह हे प्रोडक्ट होतील लॉन्च

Apple या इव्हेंटमध्ये iPad Air आणि iPad Pro 2024 लॉन्च करू शकते
Apple event
Apple event esakal

Apple Event :

दरवर्षी अनेक मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन Apple करत असते. यंदाही Apple काय नवे प्रोडक्ट आणणार याची प्रतिक्षा चाहते करत असतात. चाहत्यांची ही उत्सुकता शिगेला पोहोचली असताना काय नवे असेल याचे उत्तर Apple ने ट्विट करून दिले आहे.

Apple ने 7 मे रोजी एका खास Apple इव्हटचे आयोजन केले आहे. कंपनीने या कार्यक्रमासंदर्भात एक पोस्ट देखील शेअर केली आहे, ज्याच्या इमेजमध्ये Apple Pencil दिसत आहे. हे स्पष्टपणे दिसून येते की व्हर्च्युअल इव्हेंटचा फोकस आयपॅड असणार आहे.

या ऑनलाईन इव्हेंटचे आयोजन 7 मे रोजी सायंकाळी 7.30 वाजता करण्यात येणार आहे. एवढेच नाही तर या इव्हेंटची थीम लेट लूज ठेवण्यात आली आहे.

Apple event
Apple Monopoly : 'इतरांना स्पर्धेची संधीच देत नाही'; अमेरिका सरकारने अ‍ॅपलला खेचलं कोर्टात.. आयफोनच्या किंमतीवरुनही खडसावलं!

Apple चा हा ऑनलाइन कार्यक्रम कंपनीच्या यूट्यूब चॅनल आणि वेबसाइटवर स्ट्रीम केला जाईल. यासोबतच हा कार्यक्रम Apple TV ॲपवर पाहण्यासाठी उपलब्ध असेल.

रिपोर्ट्सनुसार, Apple या इव्हेंटमध्ये iPad Air आणि iPad Pro 2024 लॉन्च करू शकते. 2021 मध्ये आलेल्या iPad Pro मध्ये काही मोठे बदल दिसून येतील. यात OLED डिस्प्ले, अपडेटेड M3 चिपसेट आणि फ्रंट फेसिंग कॅमेऱ्याचा समावेश असेल.

हे नवीन ऍपल पेन्सिल, ॲल्युमिनियम बिल्ड आणि मोठ्या ट्रॅकपॅडसह पुन्हा डिझाइन केलेले मॅजिक कीबोर्ड देखील सादर करू शकते.

Apple event
Apple iPhone Repair : अ‍ॅपलच्या ग्राहकांना कंपनीने दिलं मोठं गिफ्ट! आता स्वस्तात दुरूस्त होणार आयफोन

Apple आपला नवीन आयपॅड दोन आकारात लॉन्च करू शकते. यामध्ये लहान आकाराची 11 इंच स्क्रीन आणि मोठा iPad Air 12.9 इंच डिस्प्ले लॉन्च केला जाऊ शकतो.

आयफोन 16 सीरीजबाबत अनेक लीक झालेली माहिती देखील समोर आली आहे. मार्क गुरमन यांनी आयफोन 16 सीरीजबद्दल त्यांच्या एका वृत्तपत्रात सांगितले होते की, आयफोन 16 सीरीजचा कॅमेरा वर्टिकल असू शकतो.

Apple event
Apple MacBook Air : अ‍ॅपलने लाँच केला मॅकबुक एअर M3 अन् M2 मॉडेल झालं स्वस्त.. किती आहे किंमत?

त्यांनी सांगितले होते की, iPhone 16 चा डिस्प्ले आधीच्या मॉडेल्सपेक्षा मोठा असू शकतो आणि iPhone 16 Pro चा डिस्प्ले साईज 6.3 इंच असू शकतो. तुम्ही 6.9 इंच सह iPhone 16 Pro Max मिळवू शकता. साईज सोडली तर आयफोन त्याचे एकंदर डिझाइन पूर्वीसारखेच ठेवू शकतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com